आयआयटी मुंबईच्या पीएचडी विद्यार्थ्यांचे कॅम्पस गेटबाहेर आंदोलन

विद्यार्थी कॅम्पस बाहेर आंदोलन करताना

रविराज शिंदे

आयआय मुंबईतील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीने शुक्रवारी (२१ डिसेंबर) प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे आयआयटीत निषेध रँली सुद्धा काढण्यात आली. यावेळी विविध विषयांवर पीएचडी करणारे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. आपल्या प्रमुख मागण्यासहित अस्तित्व टिकवण्यासाठी, जगण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी बोलताना विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी आयआयटीचे डीन यांच्याकडे आपल्या मागणीचे पत्र दिले असून, लवकरात लवकर या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.

प्रमुख मागण्या
• स्कॉलरशीपमध्ये ८०% वाढ
• गृह भाडे भत्ता वेळेनुसार वाढवावे
• दिलेल्या तारखेलाच खात्यात स्कॉरशीपचे पैसे जमा करावेत
• ऑनलाईन संकेतस्थळावर स्कॉलरशीप विद्यार्थ्यांची माहीती आणि त्यांचे कार्य प्रसारित करावे
• संकेतस्थळारील माहीतीसाठी संघटन समिती आणि केंद्रीय चाचणी समिती स्थापन करणे
• सेवा अंमलात आणत, एप्रिल २०१८ पासून गृहीत धरावी

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!