आयआयटी मार्केट सिग्नल बंद ठेवत नागरिकांच्या जीवाशी खेळ

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेविएलआर) सुरु असणाऱ्या मेट्रो-६च्या कामाच्या नावाखाली बंद ठेवण्यात आलेल्या आयआयटी मार्केटजवळील सिग्नलमुळे स्थानिक नागरिकांना जीवावर उदार होत रस्ता क्रॉस करावा लागत आहे. यामुळे या परिसरात अपघाताची शक्यता वाढली असून, लोकांच्या जीव गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

पाठीमागील काही महिन्यांपासून जोगेश्वरी विक्रोळी मार्गावरून जाणाऱ्या मेट्रो ६ प्रकल्पाचे काम जोमाने सुरु आहे. मात्र कित्येक वर्ष चिंचोळ्या रोडवरून प्रवास करून हैराण परेशान झालेल्या मुंबईकरांना जेविएलआरच्या रुपात थोडा दिलासा मिळाला होता. मात्र काहीच वर्षात मेट्रो-६च्या रुपात एक नवीन प्रकल्प या मार्गावर सुरु झाला आणि नागरिकांच्या समोर पुन्हा नव्याने समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. या समस्येमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे आयआयटी मार्केट येथील सिग्नल मेट्रो कामाच्या नावाखाली बंद ठेवत नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. पवईकर विशेषतः आयआयटी मार्केट भागात राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, या परिसरात अपघाताची शक्यता वाढली आहे.

पूर्वी या भागात सिग्नल सोबतच पादचारी पुलाची सुद्धा सोय होती. त्यामुळे नागरिक कोणत्याही धोक्याशिवाय सहजतेने रस्ता क्रॉस करू शकत होते. मात्र या भागात येणारे मेट्रो स्थानक आणि मेट्रोच्या मार्गात अडथळा निर्माण होत असल्याने येथील पादचारी पूल हटवण्यात आला आहे. तसेच सिग्नल सुद्धा बंद ठेवण्यात आला आहे.

“सिग्नल बंद ठेवल्याने या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या न थांबता सुसाट जात असतात. त्यातच पादचारी पूल नसल्याने नाविलाजास्तव आम्हाला जीवावर उदार होत या पळणाऱ्या गाड्यांच्या मधूनच रस्ता क्रॉस करणे भाग असते.” असे याबाबत बोलताना महात्मा फुलेनगर भागातील नागरिकांनी सांगितले.

“सकाळी या परिसरातील अनेक नागरिक हे आसपासच्या परिसरात कामासाठी जात असतात. याचवेळी पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या मार्गावर गाड्यांची वर्दळही खूप मोठ्या प्रमाणात असते. यातून रस्ता क्रॉस करणे म्हणजे धोका पत्करणे होय आणि असा धोका पत्करून रस्ता क्रॉस करणे म्हणजे अपघाताची शक्यता सुद्धा जास्त आहे. यासाठी आम्ही नागरिकांच्या सह्यांसह प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी यांना पत्रव्यवहार केला आहे, मात्र काहीच परिणाम दिसून येत नाही.

नागरिकांच्या या समस्येसाठी मनसे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी सुद्धा वाहतूक विभागाला पत्रव्यवहार केला आहे.

यासंदर्भात आवर्तन पवईशी बोलताना पवई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी सांगितले कि, “मेट्रोच्या कामामुळे काहीकाळ हा सिग्नल बंद होता. मात्र आम्ही याचा सतत पाठपुरावा करत असून, येणाऱ्या आठवड्यात या सिग्नलला पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. तसेच येथून क्रोसिंग करणाऱ्या नागरिकांचा विचार करता आम्ही आणखी काय उपाययोजना करता येते का हे सुद्धा पाहत आहोत.”

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रोजेक्ट मॅनेजर यांनी आवर्तन पवईशी बोलताना या माहितीला दुजरा देताना लवकरच त्यांच्याकडून सिग्नल सुरु करण्याच्या मार्गातील अडथळा दूर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

English Summary

IIT market signals not working, Authorities playing with the lives of citizens

The signal near IIT Market, on the Jogeshwari Vikhroli Link Road (JVLR), was closed under the guise of Metro-6, which has forced locals to cross the road dangerously. This has increased the chances of accidents in the area

A new project in the form of Metro-6 was started on this route and new problems are started. One of the biggest problems in this is that the Signal at IIT Market is being closed and the game is being played with the lives of the citizens. Powaiites, especially those living in the IIT market area, are facing a lot of problems when crossing the road.

In the past, there was a pedestrian bridge along with the signal in this area. So the citizens could easily cross the road without any danger. However, the pedestrian bridge has been removed due to the obstruction of metro stations and metro routes in the area. The signal is also turned off.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!