पवईत सुरु झाले पॅक्ट टेलिमेडिसीन आणि ऑक्सिजन केंद्र

पॅक्ट टेलिमेडिसीन आणि ऑक्सिजन केंद्राचे उद्घाटन

गौरव शर्मा: ‘आशा मुंबई’ या आशा फॉर एज्युकेशन या वंचित मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय चळवळीच्या मुंबई शाखेने सहयोग या पवईतील सामाजिक संघटनेसोबत एकत्र येऊन ‘पॅक्ट’ हे टेलिमेडिसीन व ऑक्सिजन केंद्र पवई येथे सुरू केले आहे. गेली १५ वर्षे आशा मुंबई आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पवईतील चाळसदृश्य वस्त्यांमध्ये शालेय शिक्षण आणि इतर सामाजिक प्रश्नांवर काम करीत आहे.

सामाजिक आरोग्यकेंद्राचे उदघाटन ऑक्सिजन पल्समीटरवर शरीरातील ऑक्सिजन पातळीची मोजणी करून केले. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील या उदघाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आशा मुंबईच्या डॉ. स्मिता पुनियानी आणि डॉ. विनय नंदा हे पॅक्ट केंद्राला वैद्यकीय मार्गदर्शन करतील.

पॅक्ट केंद्रात प्रतिबंधात्मक आरोग्यसुविधा, करोनासंबंधी प्राथमिक तपासणी, अधिक वैद्यकीय सल्ल्यासाठी तज्ज्ञांशी इंटरनेटद्वारे सल्ला मसलत व समुपदेशन उपलब्ध करण्यात आले आहे. “योग्य प्राथमिक उपचारांची वेळेवर, अतिशय जवळ आणि सहज उपलब्धता असेल तरच समाजातून कोरोनाच्या अनाठायी भीतीला हद्दपार करता येईल” असे प्रतिपादन केंद्राच्या वैद्यकीय चमूने यावेळी बोलताना केले.

पॅक्ट टेलिमेडिसीन आणि ऑक्सिजन केंद्राचे उद्घाटन

मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत चालला असताना पवईचा आकडा सुद्धा मोठा आहे. रात्री अपरात्री अँब्युलन्सचे आवाज आपल्या काळजाला भेदून भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. कोविड १९ने संपूर्ण मुंबईत थैमान घातलेले असताना पवईतील सामाजिक संघटना मात्र संकटाशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत.

सहयोग संस्थेचे तरुण आणि सृजनशील कार्यकर्ते या कोरोना लढाईत अग्रेसर आहेत . त्यांनी या केंद्राची कल्पना यावेळी विषद करून सांगितली. “आपण कोरोना बाधित आहोत की नाही याची खातरजमा करून घेण्याबरोबरच तातडीने ऑक्सिजनची उपलब्धता आणि रूग्णालयाशी संपर्क करण्यासाठी आमचे केंद्र सतत कार्यरत असेल. रुग्णालयात जागा उपलब्ध होण्याआधी रुग्णाची प्रकृती स्थिर राहून काही उपचार त्वरीत होऊ शकतील. ऑक्सिजन सप्लाय, ऑक्सिजन सिलिंडर, वैद्यकीय सल्ला आणि रुग्णालय संपर्क आपल्याच वस्तीत सहज उपलब्ध झाल्याने साहजिकच लोकांवरचा मानसिक ताण यामुळे नक्की कमी होणार आहे.

पवईत कुठे आहे पॅक्ट टेलिमेडिसीन आणि ऑक्सिजन केंद्र

पॅक्ट टेलिमेडिसीन आणि ऑक्सिजन केंद्र आयआयटी पवई मेनगेट समोरील केरला समाजम इमारतीत चालणार आहे. भेटीसाठी व तपासणीची वेळ ठरवण्यासाठी 9987695413 या व्हॉट्सऍप क्रमांकावर संपर्क करावा. किंवा केंद्राच्या [email protected], [email protected] ह्या इमेल वर1 संपर्क करता येणार आहे.

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!