पवई, चांदिवलीत स्वातंत्र्यता दिवस मोठ्या उत्साहात

पवई आणि चांदिवलीच्या विविध भागात काल (शनिवार) १५ ऑगस्ट २०२० रोजी ७४वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीला पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत जागोजागी देशाच्या या उत्सवात भारतीय सहभागी झाले होते. पवई आणि चांदिवलीतील विविध ठिकाणी साजरा झालेल्या या उत्सवाचा आवर्तन पवईने घेतलेला हा आढावा.

पवई चांदिवली येथील ध्वजारोहणाची सुरुवात पवई आणि साकीनाका पोलीस ठाण्यात ध्वजारोहणाने झाली. यानंतर विविध परिसर आणि सोसायट्यांमध्ये पोलीस, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रम पार पडले.

 

पवईतील आदिवाशी पाड्यात ध्वजारोहण

पवईचा इतिहास जपणारे विविध २७ पाडे आजही पवई आणि आरे कॉलोनीच्या हद्दीत आहेत. या पाड्यातील मुलांना शिक्षण देण्यासोबतच त्यांच्या समस्यांसाठी लढणाऱ्या ज्ञान शिक्षण प्रसारक मंडळाचे रमेश देवरे यांच्या माध्यमातून या आदिवाशी पाड्यात पवई पोलिसांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या नंतर मुलांना या दिवसाचे महत्व पटवून देत मिठाईचे वाटप करण्यात आले.

पवईतील नामांकित संस्था माऊली फौंडेशनच्यावतीने येथील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सुद्धा करण्यात आले. यावेळी माऊली फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष महेश ना. गिराम, निलेश वडराळे, मनोज धोत्रे, संदेश पाटील, शैलेश साम्ब्रे, अझर शेख, सजू (अण्णा) आचार्य, मयूर गायकर, राहुल धोत्रे, प्रियांका राजेनिंबाळकर, सोनम पसारे, करिश्मा पसारे, पूजा आवतादे, तेजल ठाकुर व इतर सहकारी उपस्थित होते.

१०वी, १२वीत उत्तुंग यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत नगरसेवक चंदन चि. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्टार युथ फाऊंडेशनतर्फे १०वी आणि १२वी परीक्षेत उत्तुंग यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ आणि गुणवंत विद्यार्थी सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी भविष्यात स्पर्धापरीक्षांमध्ये भाग घेऊन यूपीएससी, एमपीएससी सारख्या परीक्षा देऊन आपले भविष्य घडवावे. स्वतः बरोबर पवईचे सुद्धा नावलौकिक वाढवावे म्हणून या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे वेगवेगळे मार्ग, वेगवेगळ्या परीक्षा, शासनातर्फे उपलब्ध असलेल्या सुविधा याबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला डॉ. मनोज सुरवाडे, सुभाष लाड, मार्कल, पंकज लाड, विजय अहिरे, राजू विधाटे, विनोद टिळक, धर्मवीर यादव, पल्लवी नाडर, गणेश यादव, दिपा रायकवार उपस्थित होते.

आयआयटी स्टाफ रहिवाशी सेवा संस्था (राणे सोसायटी)

कोरोना वॉरिअर्सच्या हस्ते ध्वजारोहण

कोरोना काळात मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या कोरोना वॉरिअर्सच्या हस्ते पवईत ध्वजारोहण करण्यात आले. अखिल भारतीय सेना, धडक कामगार युनियन आणि सुपर आपत्कालीन दूत असोसिएशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेतर्फे मोफत आरोग्य आयुर्वेदीक चिकित्सा शिबीराचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. पवईमधील जनतेचा याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास २५० लोकांनी आपली तपासणी करून घेत आयुर्वेदीक औषधांचा लाभ घेतला. समाधान बिरारे (अखिल भारतीय सेना वॉर्ड अध्यक्ष १२२), प्रकाश निकम (धडक कामगार युनियन ईशान्य मुंबई सचिव), रमेश जाधव (सुपर आपत्कालीन दूत असोसिएशन), अनिल बिरारे (समाज सेवक), प्रविण वाघमारे (अखिल भारतीय सेना वॉर्ड सरचिटणीस) महेंद्र सोलंकी, अतुल गाडे, प्रशांत आग्रे, राजू सांगाडे हे यावेळी उपस्थित होते.

कोरोना वॉरिअर्सच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय जनता पार्टी वार्ड १२२च्यावतीने ७४वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. यावर्षी कोरोनाच्या य़ा महामारीच्या काळात जनतेसाठी अहोरात्र काम करणा-या आरोग्य सेविका सौ. चित्रा पंडागळे, स्वाती कोळगे, संपदा कदम, जयश्री कांबळे, आशा वाघमारे आणि अर्पा गाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी श्रीनिवास त्रिपाठी (नामनिर्देशित नगरसेवक), वैशाली श्रीकांत पाटील (नगरसेविका- वॉर्ड १२२), विलास सोहनी (अध्यक्ष – भाजपा वॉर्ड १२२) आणि पदाधिकारी उपस्थित होते.

निवारा हक्क सुरक्षा समिती

निवारा हक्क सुरक्षा समितीच्यावतीने २००७ पासून संघर्षनगर, चांदिवली येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो. यावर्षीही ध्वजारोहण करत कोरोना योद्धा पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांचा यावेळी समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

 

श्री गणेशनगर, पंचकुटीर

स्वातंत्र्य दिनानिमित्त इंदिरानगर, पवई येथे ध्वजारोहण करण्यात आले

चांदीवली मनसे गड १६० स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण

सदगुरू सोसायटी म्हाडा कॉलनी चांदिवली

संघर्षनगर बीट चौकी

पवई इंग्लिश हायस्कूल

आरपीआयतर्फे ध्वजारोहण

प्रतिक कांबळेकोरोना वायरसने जगभरात थैमान घातले असताना देशासाठी व देशाचा तिरंग्याचा मान टिकून राहण्यासाठी सदैव तप्तर असलेल्या कोरोना योद्धांनी स्वातंत्र्य दिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट आयोजित कार्यक्रमात राष्ट्र ध्वजाला सलामी दिली.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब धावारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मास्क लावून स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांना मिठाई व चॉकलेट देत आनंद व्यक्त केला गेला. या कार्यक्रमात वार्ड १२२ अध्यक्ष बौध्दाचार्य एम. डी. वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा संघटक उत्तम चोपडे, आर.पी.आय (आठवले) विक्रोळी तालुका युवा कार्याध्यक्ष राहुल गच्चे, शेषराव दवणे, प्रकाश गव्हाडे आदी उपस्थितीत होते.

चैतन्यनगर, पवई

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!