आयआयटी पवईत ४० रुग्ण ठेवल्याची माहिती खोटी – जनसंपर्क अधिकारी

आयआयटी पवईत ४० रुग्ण ठेवल्याची माहिती खोटी – जनसंपर्क अधिकारी

आयआयटी मुंबईत काम करणारे हाऊसकिपिंग कामगार सहीत अन्य विभागात काम करणाऱ्या काही लोकांकडून पवईत या कॅम्पसमध्ये ४० रूग्ण आणण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. आमची ड्युटी तिथेच आहे असं ‘डंके की चोट पर’ सांगितले जात आहे. यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या संदर्भात आयआयटी मुंबई जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती विचारली असता त्यांनी या माहितीला नाकारले आहे.

शासनाने येथील विलगीकरण कक्ष रद्द केल्यानंतर आयआयटी पवईत ४० रुग्णांना ठेवणे कसे शक्य आहे? असा सवाल ही प्रशासनाने यावेळी व्यक्त केला आहे.

पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, कायदा सुव्यवस्थेच्या नजरेतून त्यांनी या माहितीला नाकारतानाच, अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होत असल्याचेही स्पष्ट केले.

सोशल माध्यमातून किंवा लोकांच्या माध्यमातून फिरणाऱ्या माहितीवर विश्वास न-ठेवता खात्री अधिकृत माध्यमातून करून घेण्याचे आश्वासन यावेळी पवई पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी अशा अफवा पसरवू नये असे आवाहनही यावेळी करण्यात येत आहे.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!