लोकांचे हरवलेले ६ लाख किंमतीचे ३४ मोबाईल रिकव्हर करणाऱ्या पवई पोलीस टीमचा पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सन्मान

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापसे मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना

मुंबईकरांचे पवई पोलिसांच्या (powai police) हद्दीत हरवलेले ३४ महागडे मोबाईल (expensive mobile phones) ज्यांची अंदाजे किंमत ६ लाख रुपये आहे, तांत्रिक तपासाच्या (technical investigation) आधारावर शोधून (recovered) त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून देणाऱ्या पवई पोलिसांच्या पथकाचा मुंबई पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) (Joint Commissioner of police – L & O) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांच्या हस्ते गुरुवारी सन्मान करण्यात आला. प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देवून पवई पोलीस ठाण्याच्या या पथकाचा सन्मान करण्यात आला. याच पथकाने पाठीमागील वर्षी १८ मोबाईल शोधून काढत त्याच्या मूळ मालकांना परत केले होते.

पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (assistant police inspector) सचिन कापसे, फौजदार मिलिंद राणे, पोलीस नाईक प्रदीप जानकर, पोलीस हवालदार बांदिवडेकर या पथकाला हा सन्मान देण्यात आला आहे. यावेळी पोलीस उपायुक्त (Deputy Commissioner of Police) परिमंडळ १० महेश्वर रेड्डी (Maheshwar Reddy) उपस्थित होते.

पोलीस नाईक प्रदीप जानकर मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना

माणसाच्या मुलभूत गरजा असणाऱ्या अन्न, वस्त्र आणि निवारा इतकाच मोबाईल सुद्धा आता माणसाची गरज बनला आहे. हाच फोन नकळत कुठेतरी हरवला, गहाळ झाला की, मोबाईल हरवणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण जगच हरवल्याचा आभास होतो. असेच हरवलेले विविध कंपन्यांचे ३४ मोबाईल फोन (lost mobile phone) पवई पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधून काढत मूळ मालकांना परत केले आहेत. सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मालकांना एमआयडीसी परिसरात पार पडलेल्या कार्यक्रमात परत करण्यात आले.

पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापसे, सहाय्यक फौजदार मिलिंद राणे, पोलीस नाईक प्रदीप जानकर आणि पोलीस हवालदार बांदिवडेकर यांनी आयएमआय नंबर आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर मोबाईल ट्रेस करून हस्तगत केले आहेत. नागरिकांकडून सन २०२०-२१च्या दरम्यान याबाबत तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रासह इतर राज्यातील भागातून हे मोबाईल पोलिसांनी मिळवले आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!