सायबर फसवणूकीत वाढ; पवईतील ज्येष्ठ नागरिकाला १.८ लाखाचा गंडा

KYC fraudsलॉकडाऊन काळात डिजिटल व्यवहार वाढल्याने सायबर फसवणुकीच्या (cyber frauds) गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशाच एका केवायसी फसवणूकीत (KYC frauds) पवईतील एका ज्येष्ठ नागरिकाला लाखो रुपयांचा गंडा पडला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात अशा गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सावधानता बाळगण्याचे निर्देश सायबर पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असल्याने बहुतेक नागरिक घराबाहेर पडत नाहीत. डेबिट / क्रेडिट कार्डची माहिती अद्ययावत करण्याच्या नावाखाली सायबर फ्रॉडस्टर्सनी ‘कॉलिंग’ सुरू केली आहे. लॉकडाऊन दरम्यान नागरिक ई-पेमेंट करीत असल्याने, नेट बँकिंग किंवा जीवनावश्यक वस्तूंसाठी ई-वॉलेट्स वापरत असल्याने केवायसी फसवणूक (KYC frauds) वाढत चालली आहे.

पवई येथील रहिवाशी असणारे ७५ वर्षीय भाटिया ह्या ज्येष्ठ नागरिकाला एका इसमाने फोन करून तो ई-वॉलेट कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. केवायसी अद्ययावत नाही केले तर खाते निलंबित करण्यात येईल, असे सांगून त्यांने वरिष्ठांची खाजगी माहिती जाणून घेतली.

“भाटिया यांना त्यांचे खाते निलंबित होण्याची भीती वाटल्याने त्यांनी बँक ऑफ बडोदाच्या खात्याचा तपशील सांगितला. पाठविलेल्या फॉर्मवर खाते क्रमांक आणि डेबिट कार्डचा तपशील नमूद करून पाठवताच पुढच्या काही मिनिटात त्यांच्या खात्यातून १.८० लाख निघून गेले होते” असे पोलिसांनी सांगितले.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पाठीमागील काही वर्षांपासून सायबर क्राइम मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. लॉकडाऊन काळात ऑनलाईन पेमेंट्सवर अवलंबून असलेल्या नागरिकांना यांच्यातर्फे टार्गेट केले जात आहे. अशा क्रमांकाची यादी सायबर पोलिसांतर्फे तयार करण्यात आली असून, त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.

सायबर सेलच्या मार्गदर्शक सूचना

  • कोणत्याही ई-वॉलेट कंपनीचा दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कधीही माहिती सामायिक करू नका.
  • आपणास समोरच्या व्यक्तीबद्दल माहिती असल्याशिवाय कधीही अ‍ॅनेडेस्क, टीमव्यूअर, क्विक्ससपोर्ट वगैरे अ‍ॅप्सवर अनुमती देवू नका. हे अॅप्स सायबर चोरांना आपल्या फोनवर प्रवेश देऊ शकतात.
  • संशयास्पद दुव्यांवर कधीही क्लिक करू नका आणि असे संदेश त्वरित हटवा.
  • केवायसी केवळ अधिकृत केवायसी पॉईंटवर एजंटशी समोरासमोर भेट घेऊन पूर्ण केली जाऊ शकते. शंका असल्यास, आपल्या फोनवरील अॅपवरून ग्राहकांच्या सहकार्यासाठी असणाऱ्या क्रमांकावर संपर्क साधा.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!