पवई कैलासनगर भागात दरड कोसळली

मंगळवारी मुंबईसह उपनगरात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पवई कैलासनगर भागात दरड कोसळण्याची घटना घडली. मंगळवार दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने नागरिकांची कसलीही हानी झाली नाही. दरड कोसळल्याने मोठे दगड रस्त्यात आल्याने रस्ता बंद झाला होता.

शिवसेना माजी नगरसेविका सौ चंद्रावती मोरे यांना कळताच त्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्ता साफ करण्यात आला आहे.

#powai #news #powainews #powaiupdates #rainupdate #mumbairains #avartanpowai

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!