शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे पवईत सरकार विरोधात निदर्शने

– अविनाश हजारे –

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सरकारविरोधी वणवा पेटला असतानाच, त्याची ठिणगी शहरी भागातही येऊन पोहोचली आहे. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक संस्था, संघटना पुढे येत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डीवायएफआय व अन्य समविचारी संघटनेंच्यावतीने बुधवारी ७ जूनला पवईमध्ये सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी इतिहासात पाहिल्यांदाच शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसत महाराष्ट्रभर आंदोलने सुरु केली आहेत. या आंदोलनांमधून सरकारविरोधी रोष ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.

शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून हमी भाव मिळावा. स्वामिनाथन समितीच्या शेतकरी हिताच्या सर्व शिफारशी लागू झाल्या पाहिजेत. शेतकरी – शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर ३००० रूपये मासिक पेन्शन मिळायला हवी. पीक विमा, सिंचन, विजेची सोय मिळाली पाहिजे. मागेल त्याला रोजगार हमी कायद्यानुसार किमान ३५० रुपये प्रमाणे रोजगार मिळाला पाहिजे. वन जमीन, देवस्थान जमीन, गायरान जमीन कसणा-याच्या नावे झाली पाहिजे. अशा अनेक मागण्या घेऊन शेतकरी १ जूनपासून संपावर आहे.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डीवायएफआय व त्यांच्याशी संलग्न असलेल्या अनेक संघटनांनी बुधवारी संध्याकाळी पवईतील चैतन्यनगर येथील मुख्य चौकात नाकासभा लावून आणि सरकार विरोधी घोषणा देत तीव्र निदर्शने केली. यावेळी मुंबईच्या विविध भागातून येवून पुरुष-महिलांनी यात सहभाग घेतला होता.

कॉ. शैलेंद्र चौहान, कॉ हरी घाडगे, कॉ निरंजन यांनी नाकासभेत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टिका करून शेतकरी संपाला मा.क.प. सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत पाठिंबा देईल असे आश्वासन दिले.

“२०१४ लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना मोदींनी शेतकऱ्यांना भरभरून आश्वासन दिली होती, मात्र तिन वर्षे उलटून गेली तरी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही आहे. उलट आम्ही अशी आश्वासने दिलीच नाहीत अस म्हणण्यापर्यंत सत्ताधा-यांची मजल गेली आहे. यामुळे नाईलाजाने शेतक-यांना संपाचे हत्यार उपसावे लागले आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्या रास्त असल्यामुळे त्यांच्या मागण्या जोपर्यंत पुरेपूर मान्य होत नाहीत तोपर्यंत मुंबईभर आमच्या पक्षाच्यावतीने आंदोलने सुरूच राहतील. असे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना कॉ. हरी घाडगे व महेंद्र उघडे यांनी सांगितले.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!