आयआयटी बॉम्बे परिसरात दिसला बिबट्या

संचारासाठी बाहेर पडलेला एक बिबट्या (Leopard) नुकताच आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) परिसरातील लायब्ररी जवळील झाडीत दिसून आला (spotted) आहे.

संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असताना वन्यजीव, पक्षी हे मात्र मुक्त संचार करत आहेत. असाच संचारासाठी बाहेर पडलेला एक बिबट्या (Leopard) नुकताच आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) परिसरातील लायब्ररी जवळील झाडीत दिसून आला (spotted) आहे. याबाबत आयआयटी बॉम्बेकडून पुष्टी सुद्धा करण्यात आली आहे. हा बिबट्या येथील काही कर्मचाऱ्यांना झाडीत बसलेला दिसल्यानंतर त्यांनी फोन आणि कॅमेऱ्याने त्याचे फोटो टिपले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा देणारे आणि अतिमहत्वाच्या कामासाठी बाहेर पडलेले लोक वगळता सगळीकडे शुकशुकाट आहे. अनेक कारखाने, कार्यालये, रस्त्यावरील वाहने बंद झाल्याने निरव शांततेचे वातावरण आहे. या शांततेचा फायदा घेत अनेक वन्यजीव, पक्षी हे मुक्तपणे संचार करताना आढळून येत आहेत. घरात बसलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या लोकांना त्यांचे आवाज आणि अस्तित्व स्पष्ट जाणवत आहे.

मुंबईतील पवई भागात असणारे आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) हे सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असल्याने येथे नेहमीच असे पक्ष्यांचे आवाज आणि वन्यजीवांचे दर्शन लोकांना घडत असते. मात्र लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आयआयटी बॉम्बे कॅम्पसमधील बरेच विद्यार्थी घरी परतले आहेत. कॅम्पस बंद असल्याने याचा फायदा घेत संचारासाठी बाहेर पडलेल्या एका बिबट्याचे (Leopard) येथील झाडीत आराम करतानाचे दर्शन (spotted) काही कर्मचाऱ्यांना घडले आहे.

या संदर्भात आयआयटी बॉम्बे जनसंपर्क अधिकारी यांनी सुद्धा बिबट्या दिसल्याची पुष्टी केली आहे.

डायरेक्टर आयआयटी बॉम्बे यांच्या फेसबुक अकाऊंटवरून रविवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडल्याचे म्हटले आहे. यात त्यांनी झाडीत बसलेल्या बिबट्याचा फोटी टाकत सिद्धेश मोहिते या एका कर्मचाऱ्यांच्या मुलाने तो फोटो काढल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रीय उद्यानाला लागून वसलेल्या आयआयटी बॉम्बे परिसरात यापूर्वीही अनेकवेळा बिबट्याचे दर्शन घडले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना हे नवखे नसले तरी सर्वाना सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

“काही दिवसांपूर्वीच येथून काहीच अंतरावर असणाऱ्या पाईपलाईन भागात एका बिबट्याला हरणाची शिकार करताना पहिले गेले आहे. त्यामुळे तिथे बिबट्याचा वावर असणे नवीन नाही. कदाचित आयआयटी बॉम्बेमध्ये दिसलेला बिबट्या हा तोच असू शकतो,” असे याबाबत बोलताना वाईल्डलाईफ वार्डन सुनिष सुब्रमन्यम कुंजू यांनी सांगितले.

फोटो: सिद्धेश मोहिते

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!