मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले हिरानंदानीच्या महाराजाचे दर्शन

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरानंदानीच्या महाराजाचे दर्शन घेतले. रिद्धी सिद्धी महिला मंडळाच्यावतीने नवीन हिरानंदानी स्कूल येथील गोपीनाथ मुंडे मैदानात आयोजित गणेशोत्सवास मंगळवारी रात्री भेट देत मुख्यमंत्री शिंदे यांनी बाप्पांचे दर्शन घेत जनतेशी संवाद साधला.

यावेळी स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिंदे समर्थक, महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावर्षी दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. दरम्यान शिंदे गटातला प्रत्येक आमदार आपल्या विभागातल्या गणपती मंडळांना भेट देत आहेत. जनसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून ओळखळे जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या गणेशोत्सवात अनेक सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देत आहेत. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी हिरानंदानी येथील हिरानंदानीच्या महाराजाचे दर्शन घेतले.

२० मिनिटांच्या त्यांच्या या भेटीत त्यांनी गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर चांदिवली मतदार संघातील विविध परिसरातील महिलांशी संवाद देखील साधला.

, , , , , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: