तरुणीला अॅसिड हल्ल्याची धमकी देवून सतावणाऱ्याला पवईत अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

विवाहाच्या मागणीला नकार दिला म्हणून एका सव्वीस वर्षीय तरुणीला अॅसिड हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पवई पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. विनायक गवळी (२८) असे या तरुणाचे नाव असून, तो बेरोजगार आहे.

एका मित्राच्या ऑक्टोबर २०१६ मधील वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरोपी आणि तक्रारदार तरुणीची भेट झाली होती. ज्यानंतर दोघांच्यात मैत्री झाली होती. अधून मधून दोघांच्यात भेटी घडू लागल्यानंतर विनायकने तिला आपल्या मनात असणाऱ्या भावना व्यक्त केल्या असताना त्याच्या शंकेखोर स्वभावाला पाहता तिने नकार दर्शवला होता.

“त्यांच्यातील मैत्री वाढत असतानाच त्याने इतर मित्रांशी दूर राहण्यास तक्रारदार तरुणीवर दबाव टाकला होता. फेब्रुवारी महिन्यात त्याने तिला लग्नाची मागणी सुद्धा घातली, मात्र तिने त्यास नकार दिला होता. या रागात त्याने तरुणीशी अर्वाच्य भाषेत बोलत स्वीकार केला नाही  तर अॅसिड हल्ल्याची धमकी दिली होती.” असे याबाबत बोलताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सतत धमकावले जात असल्याने १३ मार्चला तक्रारदार तरुणीने पवई पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंद केली होती. पवई पोलिसांनी यासंदर्भात भादवि कलम ३५४ नुसार गुन्हा नोंद करून, २ टिम बनवून आरोपीचा शोध सुरु केला होता. अखेर शनिवारी त्याला अटक करून कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!