मराठा आरक्षणासाठी पवईत आंदोलन


आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पवईसह मुंबईत विविध ठिकाणी रविवारी आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे मराठा समाजाने रस्त्यावर उतरत आंदोलने केली. पवईतील आयआयटी मेनगेट समोर मराठा समाजांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत, जोपर्यंत स्थगिती उठविली जात नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुठलीही सरकारी भरती होऊ देणार नाही, अशा आमच्या मागण्या असल्याचे आंदोलक पंकज लाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मराठा समाजाचे आजचे आंदोलन शांततेत पार पडले आहे, पण आरक्षण मिळाले नाही, तर समाजाचा उद्रेक होईल व त्याला सरकार जबाबदार असेल, असे येळी बोलताना राहूल कदम यांनी स्पष्ट केले.

या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पवई पोलिसांतर्फे मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोरोनामुळे सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून आंदोलक यावेळी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. हातावर काळ्या पट्ट्या बांधत यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध केला.

समाजाने कायदेशीर मार्गाने आपले म्हणणे मांडले होते. न्यायालयात सुद्धा आम्ही लढाई लढली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. “आमचा इतिहास चांगला आहे मात्र आता आमच्या समाजाची स्थिती सुद्धा खराब होत आहे. अशात आमच्या समाजातील तरुणांच्या भविष्याचा सरकारने विचार करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने याची पाठराखण करत आम्हाला आरक्षण मिळवून द्यावे हीच आमची मागणी आहे.” असे यावेळी बोलताना लाड गुरुजी यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!