पवईत मोटारसायकल चोराला अटक; एक्टिवा, रिक्षा हस्तगत

३ एक्टिवा मोटरसायकल १ युनिकॉन मोटारसायकल आणि १ रिक्षा हस्तगत. अजून ही बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

पवई पोलिसांनी हस्तगत केलेल्या गाड्या

पवई, साकीविहार, मरोळ भागात मोटार सायकल चोरी करून त्याचे पार्ट काढून मार्केटमध्ये विकणाऱ्या एका सराईत चोराला पवई पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली आहे. कमलेश प्रजापती (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तुंगागाव येथील रोडसाईड गॅरेजमध्ये तो मॅकॅनिक म्हणून काम करतो.

पवई पोलिसांनी त्याच्याकडून ३ एक्टिवा मोटारसायकल, १ युनिकॉन मोटारसायकल आणि १ रिक्षा हस्तगत केली आहे. २८ मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली असून, आज त्याला परत कोर्टात हजर केले जाणार आहे.

पवई पोलीस ठाण्याच्या एका विशेष पथकाने ऑगस्ट २०१५ रोजी मोटारसायकल चोरीच्या मोठ्या गुन्ह्याची उकल करत, पार्कसाईट येथून एका मॅकॅनिकला मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्याकडून ३२ एक्टिवा आणि ६ कार हस्तगत करून परिसरात होणाऱ्या मोटारसायकल आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घातला होता. मात्र गेल्या काही महिन्यात पवई, चांदिवली, मरोळ हद्दीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला आहे.

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हिरानंदानी, साकीविहार रोड आणि मरोळ भागात १० ते १२ गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एक्टिवा गाडीला चोरांकडून प्राधान्य देण्यात आले होते. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश काळे, पोलीस हवालदार कुंभार, पोलीस नाईक देसाई, पोलीस नाईक जगताप, पोलीस शिपाई जाधव, पोलीस शिपाई बांधकर, पोलीस शिपाई गलांडे यांचे एक विशेष पथक या चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी काम करत होते.

“आम्हाला आमच्या खास खबऱ्याकडून एक मॅकॅनिक गाडी चोरी करून, त्याचे पार्ट काढून विकत असल्याची माहिती मिळाली होती. ज्याच्या आधारावर आम्ही त्याच्यावर पाळत ठेवून गुन्ह्यात त्याला अटक केली आहे” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश काळे यांनी सांगितले.

चोरी करण्याची पद्दत

प्रजापती हा चोरी करायच्या मोटारसायकलवर नजर ठेवून असे, संधी मिळताच मोटारसायकल चोरी करून रस्त्याच्या कडेला कोणाची सहजासहजी नजर पडणार नाही अशा ठिकाणी उभी करत असे. पुढे हळू हळू त्याचे पार्ट काढून घेवून विके किंवा त्याच्याकडे दुरुस्तीसाठी येणाऱ्या गाड्यांमध्ये ते पार्ट बदली करण्यासाठी वापरत असे.

पवई पोलिसांनी भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद करून प्रजापती याला अटक करून कोर्टात हजर केले असता त्याला २८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

3 Responses to पवईत मोटारसायकल चोराला अटक; एक्टिवा, रिक्षा हस्तगत

  1. Nitesh mhadgut March 30, 2018 at 5:45 am #

    Gr8 job powai police….. hats off all team…

  2. Nitin Gavli March 28, 2018 at 5:11 pm #

    Raju dada majhya mitrachi pan activa chori la geli ahe powai ithun ek month jala ahe

  3. Suhas Mali March 28, 2018 at 5:10 pm #

    हे परप्रांतीय आहेत

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!