चांदीवली म्हाडा वसाहतीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; एक किरकोळ जखमी

चांदीवली येथील म्हाडा वसाहतीत असणाऱ्या निसर्ग हाऊसिंग सोसायटीमधील दोन माळ्यांचा स्लॅब कोसळल्याची घटना रविवारी घडली. सुदैवाने दोन्ही घरात कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरात काम करणारा एक कामगार यात किरकोळ जखमी झाला.

चांदीवलीतील म्हाडाची ही इमारत सुमारे तीस वर्षे जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. या इमारतीचे बांधकाम साधारणपणे १९९२ – ९३च्या दरम्यान झालेलं आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरात दुरुस्तीचे काम सुरू असताना स्लॅब कोसळल्याची ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, साकीनाका पोलीसांनी घटनास्थळी पोहचत मलब्याखाली कोणी अडकले नसल्याची खात्री केली. स्लॅब कोसळला त्यावेळी सुदैवाने घरात कोणीच नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र पहिल्या मजल्यावर काम करत असणारा एक मजूर यात किरकोळ जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

घटनेची माहिती मिळताच परिसरात लोकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान या घटनेने आता जुन्या इमारतींच्या स्थितीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने त्वरित यात लक्ष घालत सर्व जुन्या इमारतींचे पुनर्निर्माण करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!