डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना धोका पाहता सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे पालिकेचे आवाहन

दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोसळणाऱ्या पावसात मुंबईत डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यावर्षी देखील मुसळधार पावसात दरड कोसळण्याचा धोका आणि पाण्याच्या लोंढ्यामुळे झोपड्यात पाणी शिरून वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका ‘एस’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवई, भांडूप, विक्रोळीतील डोंगराळ भागातील चाळसदृश्य घरात राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन पालिका एस विभागातर्फे करण्यात आले आहे.

स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाशांनी स्वत:च्या जबाबदारीवर तिथेच रहावे, नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास पालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नसल्याचे पालिका ‘एस’ विभागाने स्पष्ट केले आहे.

पवई परिसरातील या भागांना इशारा

पवई येथील इंदिरानगर, गौतमनगर, पासपोली, जयभीमनगर, भांडूप येथील माता रमाबाई आंबेडकर नगर १ व २, तसेच विक्रोळी परिसरातील सूर्यानगर या ठिकाणी डोंगराच्या उतारावर वसलेल्या रहिवाशांना प्रशासनाकडून हा इशारा देण्यात आला आहे.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!