आयआयटी बॉम्बे नव्हे मुंबईच; मनसेचे आयआयटी प्रशासनाला पत्र

यआयटी बॉम्बेचा उल्लेख आयआयटी मुंबई असा करणे चुकीचे आहे अशी नाराजी व्यक्त करत गुरुवारी प्रसारमाध्यमांना आयआयटी प्रशासनाने बॉम्बे असा उल्लेख करण्याच्या सूचना दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. आयआयटी प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शवत सोमवारी मनसेचे विक्रोळी विधानसभा विभाग अध्यक्ष विनोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम, अशोक जाधव व शाखा अध्यक्ष (१२२) शैलेश वानखेडे, जयंत दांडेकर आणि मनसे कार्यकर्त्यांनी आयआयटी बॉम्बे नव्हे आयआयटी मुंबई असे नामकरण करावे अशा सूचनेचे पत्र पवई येथील आयआयटी मुंबईचे कुलसचिव, रजिस्ट्रार आर. प्रेमकुमार यांना सुपूर्द केले.

यावेळी जनहितकक्ष विधी विभागाचे पृथ्वीराज येरुणकर व मनकासेंचे चिटणीस परशुराम साळवे सुद्धा उपस्थित होते.

जगभर आपल्या संशोधन आणि वेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पवई येथील आयआयटी बॉम्बेचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आयआयटी मुंबई असा केला जात असून, हा उल्लेख चुकीचा असल्याचे सांगत बॉम्बे असा उल्लेख करण्याची सूचनाच प्रसार माध्यमातील प्रतिनिधीना दिल्याची बातमी गेल्या आठवड्यात एका मराठी दैनिकात छापून आली होती. ज्यानंतर मनसेने याला विरोध दर्शवत बॉम्बे नव्हे तर मुंबई असेच नामकरण करण्याची मागणी करणारे पत्र सोमवारी आयआयटी प्रशासनाला दिले.

“ही बाब अतिशय गंभीर आहे; १९९५ मध्ये अधिनियमात कायदेशीर घटनात्मक बदल करून बॉम्बेचे मुंबई करणारे आदेश काढले आले आहेत. केंद्रात सुद्धा यात आवश्यक बदल करून सर्व सरकारी कागदपत्रांवर मुंबई असाच उल्लेख केला जात आहे. मात्र पवईमधील आयआयटी मुंबई याला विरोध दर्शवत असून, बॉम्बे असा उल्लेख करावा असा ते सर्वांना आदेश देत आहेत, जे आम्हाला कदापि मान्य नाही. आयआयटी बॉम्बे नाही तर आयआयटी मुंबई असाच त्याचा उल्लेख झाला पाहिजे” असे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना मनसे शाखाप्रमुख शैलेश वानखेडे यांनी सांगितले.

आम्ही प्रशासनाला पत्र देवून ‘बॉम्बे’ ऐवजी ‘मुंबई’ असा नावात बदल करण्याची मागणी केली आहे. संस्थेचे अशा प्रकारचे सर्व कामकाज दिल्लीतून चालत असल्याने तिथे याबाबत चर्चा करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!