आयआयटी कॅम्पसमध्ये ‘माकड’ चेष्टा

छायाचित्र: इनसाईट

भारतीय प्राध्योगिकी संस्थान (आयआयटी) पवईच्या कॅम्पसमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. वसतिगृहात घुसून, परिसरात कचरा टाकून घाण करणे, सुकण्यासाठी टाकलेली कपडे फेकून देणे, विद्यार्थ्यांच्या वस्तू चोरी करणे अशा कुरापती ही माकडे करत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. साईन – थिटा सारखी अवघड अभियांत्रिकी गणिते सोडवणाऱ्या येथील इंजिनिअर्सना आता या माकडांना पीटा म्हणावे लागत आहे.

आयआयटी, पवईचे अधिकृत विद्यार्थी बातमी पत्र ‘इनसाईट’ने दिलेल्या बातमीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून विद्यार्थी वसतिगृह क्रमांक ३, ५, ७, ९ येथे माकडांनी धुमाकूळ घालून विद्यार्थ्यांना हैराण केले आहे. विद्यार्थी पहाटेे उठत आहेत ती घड्याळाच्या गजर वाजण्याने नाही तर या माकडांच्या ओरडण्याने आणि पटांगणात चालू असणाऱ्या धुमाकुळामुळे. दिवसाच्या अनेक वेळात येथे माकडांचा एक कळपच फिरताना आढळून येतो.

एखाद्या विद्यार्थ्याने आपली रूम खाली सोडली कि हे त्या रूममध्ये घुसून त्याचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकत आहेत. त्यांना खायला काही मिळाले तर ते प्रांगणात असणारे कचऱ्याचे डबे उलटेपालटे करून संपूर्ण परिसरात घाण पसरवत आहेत. विद्यार्थ्यांनी सुकण्यास टाकलेली कपडे, पुस्तके फेकून देणे, कपाटांवर चढून बसणे असे प्रकारही माकडे येथे करत आहेत. काही विद्यार्थ्यांना तर ही माकडे आपल्या बेडवर जावून झोपलेली आढळून आल्याने वसतिगृहांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांनुसार “कॅपसमध्ये माकडांचे असणे नवीन नाहीे. मात्र, गेल्या काही आठवड्यात त्यांनी घातलेला धुमाकूळ मात्र नवीन आहे. ज्या वसतिगृहांना बाल्कनी आहे तेथे या माकडांनी आपला अड्डा बनवून ठेवला आहे. वसतिगृहात सगळे उथल पुथल करून विद्यार्थ्यांना हैराण करून सोडले आहे.”

विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना काळजी घेण्याचे आणि आपले किमती आणि महत्वाचे सामान सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे. सोबतच बाहेर पडताना शक्य असल्यास यांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी छोटी काठी सुद्धा सोबत ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.

एरवी अगदी किचकट अभियांत्रिकी गणित सोडवणारे विद्यार्थी या समस्येला सोडवण्यात मात्र पिछाडलेली पाहायला मिळत असून, आता या माकडांना पिटा अशी मागणी करत आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

[related_posts limit=”5

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!