मान्‍सून स्‍पेशल : तुमच्‍या त्‍वचेसाठी आवश्‍यक सौंदर्य प्रसाधने

रेने कॉस्‍मेटिक्‍सच्‍या सह-संस्‍थापिका आश्‍का गोराडिया गोबल

पावसाळ्यामध्‍ये चेह-यावरील मेकअप दीर्घकाळपर्यंत राहत नाही. पण तुम्‍हाला सांगितले की, हवेमध्‍ये आर्द्रता असताना देखील चेह-यावर चमक व तेज कायम राहिल असे मेक-अप करण्‍याचे अनेक मार्ग आहेत, तर त्‍यावर तुमचा विश्‍वास बसेल का? यामध्‍ये महत्त्वाचे म्‍हणजे पावसाळ्यामध्‍ये तुम्‍ही भिजल्‍यानंतर देखील मेकअप कायम ठेवू शकतील अशा उत्‍पादनांची निवड करणे. चला तर मग पावसाळ्यामध्‍ये तुम्‍हाला मेकअप टिकून राहण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या उत्‍पादनांबाबत जाणून घेऊया.

या मेकअप व सौंदर्य प्रसाधनांसह मान्‍सूनचा आनंद घेण्‍यास सुसज्‍ज व्‍हा:

१) लिप व चीक टिंट वापरणे हा तुमचे ओठ व गालांना चमक देण्‍याचा अत्‍यंत सोपा व जलद मार्ग आहे. यामधून तुम्‍हाला नैसर्गिक व फ्रेश मेकअप लूक मिळेल. तुम्‍हाला फक्‍त याचा योग्‍यरित्या वापर करायचा आहे.

२) वॉटरप्रूफ, स्‍मज-प्रूफ व ट्रान्‍सफर-प्रूफ मॅट लिपस्टिक्‍सची निवड करा. या लिपटिक्‍स पसरत नसल्‍यामुळे तुमच्‍यासाठी योग्य आहेत आणि आर्द्र वातावरणामध्‍ये देखील दीर्घकाळपर्यंत टिकून राहतील.

३) मेक-अप दीर्घकाळपर्यंत टिकून राहण्‍यासाठी आणि त्‍वचेला आकर्षक करण्‍यासाठी नॉन-स्टिकी व हलके प्राइमर, प्री-मेकअप ऑइल किंवा ऑल-इन-वन बीबी क्रीम निवडा.

४) वॉटरप्रूफ व स्‍मज-प्रूफ आयलाइनरची निवड करा, कारण पावसात भिजल्‍यानंतर देखील हे आयलाइनर चेह-यावर पसरत नाही.

५) हवेमध्‍ये उच्‍च आर्द्रता असल्‍यामुळे तुमची त्‍वचा नेहमीपेक्षा अधिक तेलकट होऊ शकते. म्‍हणून पावसाळ्यामध्‍ये जलरोधक, वॉटरप्रूफ व हलक्‍या उत्‍पादनांचा वापर करणे उत्तम आहे. चेह-याला ताजेपणा देण्‍यासाठी हलके ब्‍लश किंवा चीक टिंटचा वापर करा, गालावर थोडेसे हायलाइटवर लावा, ज्‍यामुळे चेहरा आकर्षक व उठून दिसेल.

पावसाळा तुमच्‍या त्‍वचेसाठी त्रासदायक असला तरी तुम्‍ही तुमच्यासाठी योग्य आणि तुम्हाला सुंदर वाटणारी उत्पादने निवडू शकता. तुमच्‍या लुकला अधिक आकर्षक करेल आणि पावसाची चिंता करता योग्य ग्‍लॅमर व आत्‍मविश्‍वास देईल अशा उत्‍पादनांची निवड करा.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!