‘मूड इंडिगो’मध्ये अवतरला भारतातला सर्वात पहिला ‘पॅडमॅन’

कॉलेज फेस्टिव्हलमधील सर्वात मोठा फेस्टिवल म्हणून ओळखला जाणारा आयआयटी मुंबईचा ‘मूड इंडिगो’ आजपासून सुरु झाला. ‘कार्निव्हल’ अशी यावर्षी साजरा होत असलेल्या फेस्टिवलची थीम असून, शुक्रवार, २२ डिसेंबर पासून २५ डिसेंबरपर्यंत हा फेस्टिव्हल आयआयटी कॅम्पसमध्ये साजरा होत आहे.

या कार्निव्हलच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण दिवसाचे आकर्षण ठरले ते अक्षय कुमार, पि चिदंबरम आणि नारायण मुर्थी.

होम प्रोडक्शनचा असणारा “पॅडमॅन’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आज आयआयटीत मुड इंडिगोचे औचित्य साधून आला होता. तर, नोटबंदी आणि जीएसटी या विषयांवर चर्चा करण्यासाठी पि चिदंबरम आणि नारायण मुर्थी यांना यावेळी आमंत्रित केले गेले होते.

धमाल मस्ती, सामाजिक उपक्रम, संगीत मैफली आणि वेगवेगळ्या स्पर्धा यांमुळे ‘मूड इंडिगो’ इतर महाविद्यालयीन फेस्टिव्हल पेक्षा तरुणाईवर जास्त छाप सोडतो. यावर्षी सुद्धा विविध माध्यमातून ‘मुड इंडिगो’ विद्यार्थ्यांच्या मनात घर करून राहील असे याच्या आयोजकांनी यावेळी बोलताना सांगितले.

‘मुड आय’च्या पहिल्या दिवसाची छायाचित्रे

 

 

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!