कोयत्याचा धाक दाखवून मॉर्निंग वॉकरला लुटले

पवईत एका मॉर्निंग वॉकरला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी (११ जानेवारी) घडल्याची समोर आले आहे. मॉर्निंग वॉकरने याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस पाहिजे आरोपींचा शोध घेत आहेत.

मरोळ येथील क्रिस्टल बिल्डींगमध्ये राहणारे आणि बांधकाम व्यावसायिक असणारे सनी छजलाना (२६) हे नेहमी प्रमाणे मरोळ येथून सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. पाईपलाईन जवळील मार्गावरून चालत ते पवई भागातील गौतमनगर भागात पोहचले असता काही अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. त्यातील एकाने कोयता दाखवत मला धमकावून माझ्याजवळील गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली. तसेच माझ्या खिशात असणारे २००० रुपये सुद्धा हिसकावून घेतले. असे पोलिसांना दिलेल्या जवाबात सनी यांनी म्हटले आहे.

“सकाळी अनेक लोक पाईपलाईन भागात मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. छजलाना हे सुद्धा त्यातील एक आहेत. ते सकाळी त्या भागात चालत असताना एकटे असल्याचा फायदा उचलत त्यांनी सांगितल्या प्रमाणे १८ ते २० वर्ष वयोगटातील तरुणांनी त्यांना गाठत जबरी चोरी केली आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“आम्ही भादवि कलम ३९२, ३७ (१-ए) नुसार गुन्हा नोंद केला आहे. चारही आरोपी तरुण नशाखोरी करणारे असावेत असे तक्रारदार यांनी त्यांच्या दिलेल्या वर्णनावरून समोर येत आहे. आम्ही परिसरात अशा तरुणांच्या सर्व अड्ड्यांवर शोध सुरु केला आहे. लवकरच सर्व आरोपी ताब्यात असतील,” असे याबाबत बोलताना तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes