पोलिसांना चेतनची आपल्या कलेतून मानवंदना

पोलिसांना चेतनची आपल्या कलेतून मानवंदना

@सुषमा चव्हाण | देशावर, समाजावर येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या वेळी त्या संकटाशी निधड्या छातीने सामना करायला देशांचे सैन्य आणि पोलीस सदैव तत्पर असतात. सध्या देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना आरोग्य कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबतच पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या या वीरांना पवईकर मोझेक आर्टिस्ट चेतन राऊत याने मास्क धारक पोलीस कर्मचाऱ्याचे पोर्ट्रेट साकारत आपल्या कलाकृतीतून पोलिसांना मानवंदना दिली आहे.

समाजासाठी आपलं जीवन वाहून घेणाऱ्या पोलिसांचे आभार आपल्या कलाकृतीतून मांडण्यासाठी चेतनने ४८६० पुशपिन वापरून ३० इंच x १८ इंच आकाराचे पोलिसाचे चित्र साकारले आहे.

“एक मोठे संकट कोरोना व्हायरसच्या रूपाने आपल्या देशावर ओढवले आहे. या संकटात पोलिस बांधव स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपल्या सर्वांसाठी रात्रंदिवस लढत आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये, गरज असेल तर मदत व्हावी, हातावरच पोट असणाऱ्या गोर गरीबांना जेवण देत आहेत, तर काही कर्मचारी मुख्यमंत्री कोरोना सहाय्यता निधीला योगदान देत आहेत. दिवसातील कित्येक तास काम करत असताना या कोरोनाची लागण आपल्याला देखील होवू शकते याचे भान असताना सुद्धा ते पाठीमागे हटत नाहीत, अशा या खऱ्या आयुष्यातील हिरोंना मी माझ्या कलेतून मानवंदना देण्याचा प्रयत्न केला आहे. असे याबाबत बोलताना चेतन याने सांगितले.

तो पुढे म्हणाला “माझे वडील नवशा नवजी राऊत हे पोलीस दलामध्ये ३३ वर्ष कार्यरत होते. त्यामुळे पोलीस कुटुंब कसं आयुष्य जगत असत याची मला चांगलीच जाणीव आहे.”

यापूर्वी अशा कठीण प्रसंगी कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज हितार्थ घेतलेले निर्णय. रतन टाटा आणि खिलाडी अक्षय कुमार याने दिलेला मदतीचा हात. या लढाईत महत्वाचा भाग असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जागतिक आरोग्य दिनानिमित्त चेतनने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आपल्या कलेतून त्यांची पोर्ट्रेट साकारली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!