साकीनाका येथे मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू

साकीनाका परिसरात पावसात मोटारसायकल घसरल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली. बुधवारी, १७ नोव्हेंबरला सायंकाळी जरीमरी परिसरात हा अपघात घडला.

मुंबईतील कलिना येथील रहिवासी असलेले राजू मडगुंडे हे आपल्या मोटारसायकलने कामावरून घरी परतत होते. “बुधवारी मुंबईत पावसाच्या हलक्या सरी पडून गेल्याने रस्ता ओलसर झाला होता. जरीमरी परिसरातून जात असताना ओल्या रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरल्याने मडगुंडे यांचा गाडीवरील समतोल बिघडून खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, असे याबाबत पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली असून, पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: