महागाईच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस ब्लॉक १२२ तर्फे पदयात्रेचे आयोजन

देशात वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने सुरू केलेल्या जन जागरण अभियानाअंतर्गत ब्लॉक क्रमांक १२२च्यावतीने २८ नोव्हेंबर रोजी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई काँग्रेस सचिव डॉ. त्रिलोकीनाथ मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत कपिल देव सिंग, जिल्हा उपाध्यक्ष विजय तिवारी, महेश लिप्चा, गणेश शिंदे, ब्लॉक अध्यक्ष प्रदीप वर्मा, सुनील सिंग, भरत सिंग, अजमत अली शेख, अनिल यादव, कमल गाडे, प्रमोद तिवारी, प्रियेश शर्मा, विनोद भारद्वाज, अमीन शेख, रमेश शर्मा, इरफान शेख, प्रवीण मोंटेरो, महिला तालुकाध्यक्ष वैशाली गावडे, कमलप्रीत कौर, विजय कनोजिया, रफिक शेख, जावेद खान, आदींनी उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी महागाई विरोधात आपला निषेध करताना महिला कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकरी बनवत महिलांच्या घरगुती गॅसच्या समस्या तर मुंबई काँग्रेसचे सचिव डॉ. त्रिलोकी मिश्रा यांनी महागाईमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर ओढवलेल्या संकटांकडे लक्ष वेधले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: