संघर्षनगर येथील रुग्णालयाच्या जागेची पालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी

पालिका अधिकारी संघर्षनगर येथील जागेची पहाणी करतानाशिवसेना आमदार दिलीपमामा लांडे यांच्या प्रयत्नांतून चांदिवली, संघर्षनगर येथे बनवण्यात येणार असलेल्या पालिका रुग्णालयाच्या जागेची मुंबई महानगर पालिका आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली. मनपा आरोग्य विभाग सहयुक्त सुनील धामणे यांच्यासह आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संघर्षनगर येथील यासाठी नियोजित जागेची पहाणी केली. यावेळी स्थानिक आमदार दिलीपमामा लांडे, माजी नगरसेवक ईश्वरजी तायडे, शाखाप्रमुख अनंत उतेकर, बाळकृष्ण गट्टे, महिला शाखा संघटिका प्रभावती पालव, धनश्री पवार, रिपाईचे भोसले उपस्थित होते.

संघर्षनगर सारख्या भागाच्या निर्मितीमुळे चांदीवलीची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या झपाट्याने वाढली आहे. संघर्षनगर परिसरात गोरेगाव, मालाड येथील वनविभागाच्या जागेवरील हजारो कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढल्याने चांदिवलीत पूर्वीपासून असणाऱ्या महानगरपालिकेच्या आरोग्य सेवा सुविधांवर प्रचंड ताण वाढला आहे. ज्याला पाहता येथील महानगरपालिकेच्या एक लाख फूट आरक्षित भूखंडावर महानगरपालिकेचे २०० ते २५० खाटांचे भव्य रुग्णालय उभारण्यात यावे यासाठी आमदार लांडे यांनी महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला होता.

पालिका रुग्णालयाची संघर्षनगर येथील आरक्षित जमीन

मंगळवार, २४ डिसेंबरला लांडे यांनी मनपा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहआयुक्त सुनील धामणे यांच्या कार्यालयात तातडीची संयुक्त बैठक घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. यावेळी सह आयुक्त सुनील धामणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रुग्णालयाच्या कामासाठी हिरवा कंदील दिला होता.

या मंजुरीला अधिकृत संमती आणि पुढील कामकाजाच्या दृष्टीने मंगळवारी संघर्षनगर येथील पालिकेच्या जागेची धामणे यांच्यासह पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!