वीर सावरकर नगरला नवी उजाळी

पवई रामबाग म्हाडा वसाहत स्थित वीर सावरकर नगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक सुस्थितीत आणण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. मंगळवारी तरुणांनी मिळून सदर स्मारका भोवती गेली अनेक दिवस पसरलेल्या झाडाझुडपांचे जंगल हटवत परिसर स्वच्छ केला.

कोरोना टाळेबंदीमुळे मुंबईकर घरात अडकून पडले होते. त्यामुळे कोरोनाशी लढा देताना या लढाईत महत्वाचा भाग असणाऱ्या पालिकेची अनेक कामे रखडली गेली होती. मात्र टाळेबंदी हटवताच पालिका पुन्हा जोमाने कामाला लागली आहे.

स्वच्छता पूर्वीची परिस्थिती

या कामात हातभार लावण्यासाठी तरुणाई सुद्धा सरसारवली आहे. शिवसेना आमदार सुनिल भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभाग प्रमुख श्री धर्मनाथ पंत यांच्या नेतृत्वाखाली पवईतील, वीर सावरकर नगर येथील स्मारकाची स्वच्छता करून स्मारक सुव्यस्थित करण्यात आले.

यावेळी विभाग युवा अधिकारी विजय कुरकुटे, शाखाप्रमुख सचिन मदने, माजी शाखाप्रमुख अरविंद शिंदे, म. शाखा संघटक सौ सुषमा आंब्रे, सोशल मिडिया शाखा समन्वयक अमोल चव्हाण, युवा शाखा समन्वयक सुमित साळुंखे, उपशाखाप्रमुख सुनील मोरे, रमेश आंबवले, माजी शाखा संघटक सुरेखा चव्हाण आणि शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!