कुख्यात गॅगस्टरला नाहर अमृत शक्ती येथून अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

खून, अपहरण, खूनाचा प्रयत्न, खंडणी या सारख्या १५ पेक्षा जास्त गंभीर गुन्हयाची नोंद असलेला कुख्यात गॅगस्टर ग्रब्रियल हंस मेबन याला चांदिवली, नाहर अमृत शक्ती येथून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष १० यांनी सापळा रचून त्याला अटक केली.

खून, अपहरण, खूनाचा प्रयत्न, खंडणी या सारख्या अनेक गुन्ह्यात सहभाग असणारा ग्रब्रियल हंस मेबन याला विठृठलवाडी पोलीस ठाणे, कल्याण येथील कलम ३०२, १२० (ब) भादविसमध्ये नोंद गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मेबन हा तेव्हापासून कारागृहात बंदीस्त होता.

कोव्हीड – १९ काळात प्रादुर्भाव वाढल्याने ९ मे २०२०ला त्याला ४५ दिवसाकरीता कोव्हीड-१९, आपत्कालीन अभिवचन रजेवर एम.आय.डी.सी येथील पत्यावर मुक्त करण्यात आले होते. त्याला १७ मे २०२२ रोजी औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात हजर राहण्याचे सांगण्यात आले होते मात्र तो हजर झाला नव्हता. तसेच त्याने दिलेल्या पत्यावर न राहता स्वतःची अटक टाळण्यासाठी विविध ठिकाणी लपून रहात होता. जे पाहता एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात याबाबत २ डिसेंबर २०२२ला कलम २२४ भा.दं.वि.सं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

यासंदर्भात कक्ष १० गुन्हे प्रकटीकरण शाखा तपास करत असताना पोलीस हवालदार माने यांना गुप्त बातमीदाराने विश्वसनीय खबर दिली की, नमूद पाहिजे आरोपी चांदिवली येथील नाहर अमृत शक्ती परिसरात लपून बसला आहे. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे परिसरात सापळा रचून त्यास त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाहून पथकाने शिताफीने ताब्यात घेवून चौकशी केली असता तो नमुद गुन्हयातील आरोपी ग्रब्रियल हंस मेबन असल्याची खात्री झाली. पुढील कार्यवाहीकरीता त्याला एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी गुन्हे शाखा कक्ष-१० प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांच्या पर्यवेक्षणाखाली सपोनि. धनराज चौधरी आणि पोलीस अंमलदार पो.ह. शेटे, पो.ह. धारगळकर, पो.ह. माने, पो.ह. धनवडे, पो. ह. नलावडे, पो. ना. जगताप, पो.शि. निर्मळे, पो.शि. चव्हाण, म.पो.शि. सोनवणे यांनी पार पाडली.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!