पवईत सापडले दीड महिन्याच्या बालकाचे शव

वईमधील पवई तलाव भागात काल (मंगळवारी) सकाळी दीड महिन्याच्या बालकाचे शव सापडल्याने एकच खळबळ उडाली. पवई पोलिसांनी शव विच्छेदनासाठी पाठवले असून, अधिक तपास करत आहेत.

मंगळवारी सकाळी पालिका उद्यान विभागातील सुपरवायझर अरविंद चिंतामणी यादव पवई तलाव भागात फेरफटका मारत असताना त्यांना एका बालकाचे शव पवई तलावाच्या रामबाग येथील भागात गाळात पडल्याचे आढळून आले.

“यादव याने पोलीस ठाण्यात येवून याबाबत माहिती दिल्यानंतर आम्ही त्याला बाहेर काढून राजावाडी येथे शवविच्छेदनासाठी नेले असून, अधिक तपास करत आहोत” असे याबाबत सांगताना पवई पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक किशोरी माने यांनी आवर्तन पवईला सांगितले.

“बालकाला किमान दोन ते तीन दिवस आधीच त्या पाण्यात फेकले असावे असे त्याच्या अवस्थेवरून समोर येत आहे. एखाद्या कुटुंबात मुलीच होत असणाऱ्या कुटुंबातील लोकांनी किंवा मुलगी नको असणाऱ्या कुटुंबाने ते बालक तेथे फेकले असण्याची शक्यता आहे” असे याबाबत बोलताना अजून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes