पालिका एस विभागात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला; घाबरून न जाण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

पालिका एस विभागात कोरोना रुग्ण सापडला

Photo Credit – सांकेतिक चित्र

जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना वायरसचा फटका आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला ही बसला असून, दिवसेंदिवस मुंबईतील बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबई पूर्व उपनगरातील बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या भांडूप ‘एस विभाग’ हद्दीत असणाऱ्या उच्चभ्रू वस्तीत राहणारी ४४ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे सोमवारी (१६ मार्च) रोजी चाचणीत समोर आले आहे.

“महिला ही १३ मार्च दरम्यान लिसवान, पोर्तुगल देशातून प्रवास करत मुंबईत आली होती.” असे याबाबत बोलताना पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोना वायरसच्या लक्षणांची चाहूल लागताच महिलेला पवईतील नामांकित रूग्णालयात दाखल करून तपासणी करण्यात आली. त्यानंतर महिलेला चाचणीसाठी कस्तुरबा रूग्णालयात पाठवले असता महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर महिलेवर कस्तुरबा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

“महिला राहत असलेल्या इमारतीची पालिकेतर्फे तपासणी करण्यात आली असून, इमारतीत एकही लक्षणे असलेला व्यक्ती आढळलेला नाही”, असे याबाबत बोलताना पालिका ‘एस विभाग’ आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दोन अतिजोखमीच्या निकट सहवाशितासोबत या महिलेला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!