पवईत रिक्षा पलटी झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

रविराज शिंदे, रमेश कांबळे

वई आयआयटी मेनगेट येथे गाडीवरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होऊन २० वर्षीय रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल गुरूवारी मध्यरात्री घडली. अंकुश सोनावणे असे या रिक्षा चालकाचे नावअसून, तो पवईतील गरिबनगर येथे परिवारासोबत राहत होता.

अंकुश हा नियमितरित्या रात्रपाळीत रिक्षा चालवण्याचे काम करत असे. गुरुवारी रात्री नेहमी प्रमाणे तो रात्रपाळीवर आपली एमएच ०३ बिए ६२६७ क्रमांकाची रिक्षा चालवत होता. रात्री रिक्षा घेवून आदि शंकराचार्य मार्गावरून आयआयटी मेनगेट येथे येताच त्याचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा दुभाजकाला धडकून पलटी झाली.

“आम्ही रात्रीच्या वेळी तेथील भागात चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचे जवाब नोंदवले आहेत. अंकुशने रिक्षातून उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र रिक्षा त्याच्या अंगावर पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता” असे प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या जवाबत म्हटले असल्याचे पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्याला त्वरित राजावाडी रुग्णालयात घेवून जाण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

शवविच्छेदनाचा अहवाल अजून मिळून आलेला नाही, त्याने रिक्षा चालवताना काही नशा केली होती का हे त्यानंतरच समोर येवू शकेल असे याबाबत बोलताना अजून एक अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes