परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने २० तरुणांना ठगणाऱ्या टोळीतील एकाला अटक

अमेरिकेत आणि कॅनडात नोकरी मिळवून देण्याचा बहाणा करून २० मुंबईकर तरुणांना १० लाखाला ठगणाऱ्या नोकरी रॅकेटमधील एकाला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. तरुणांनी साकीनाका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आठवीतून शाळा सोडलेल्या बावीस वर्षीय अशोक चौधरी याला सदर गुन्ह्यात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साकीनाका जंक्शन येथे असणाऱ्या ग्लोबस इमिग्रेशन सर्व्हिसेस या त्याच्या कार्यालयातून त्याला अटक करण्यात आली. त्याचे इतर दोन साथीदार जे या संपूर्ण घोटाळ्याचे योजनाकर्ते आहेत त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

वर्क विजा मिळवण्यासाठी भरावे लागणारे रुपये ५०,००० सर्व तरुणांनी भरूनही एजेन्सीकडून होणारी टाळाटाळ, विजा मिळण्यासाठी लागणारा विलंब पाहता तरुणांना फसवणुकीचा संशय आल्याने त्यांनी खात्री करून घेत साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

एजेन्सी आणि तक्रारदार तरुण यांच्यात बनवण्यात आलेल्या करारानुसार वर्क विजासाठी रक्कम भरणा केल्याच्या १२० दिवसाच्या आत त्यांना तो मिळणे आवश्यक आहे. विजा न-मिळाल्यास त्यांना रक्कम परत करणे आवश्यक आहे. मात्र करारात असणाऱ्या कोणत्याच गोष्टीची पूर्तता होत नसल्याने जेव्हा तरुण तिथे धडकले तेव्हा अनेक तरुणांची फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या समोर आले.

‘आम्ही तरुणांनी दिलेल्या तक्रारींच्या आधारावर विश्वासघात आणि फसवणूक करण्याचा गुन्हा नोंद करून चौधरी याला अटक केली असून, त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहोत.’ असे माध्यमांशी बोलताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes