
हि दोस्ती तुटायची नाही, मृत्यूशी झुंजताना सुद्धा दिली एकमेकांची साथ
‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे’ हे शब्द कानावर पडताच समोर चित्र उभे राहते ते शोले मधील जय (अमिताभ बच्चन) आणि विरू (धर्मेंद्र) यांच्या मैत्रीचे. अशीच एक मैत्री पवईत वाढली आणि शनिवारी पवईच्या अग्नी तांडवात मृत्यू सोबत पण टिकून राहिली. ही कहाणी दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नसून लेक होममध्ये लागलेल्या […]

लेकहोम अग्नीतांडव: बचावकार्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी जमा होतोय निधी, १० लाख जमा, अजूनही आर्थिक मदतीची गरज
लेकहोम फेज तीनमधील लेक ल्यूसर्न इमारतीला लागलेल्या आगीत अडकून पडलेल्या रहिवाशांचे जीव वाचवण्यासाठी, रहिवाशी नसून सुद्धा केवळ मानवताधर्म निभावण्यासाठी निस्वार्थ बचावकार्य करणारे, पाच लोक आपल्या जीवाला मुकलेले आहेत. तर काही जखमी झालेले आहेत. यातील काही हे आपल्या परिवाराचे एकमेव कमवते होते. आपल्या प्राणांचीही पर्वा न करता, निस्वार्थ मदत करणाऱ्या या लोकांसाठी, लेक ल्यूसर्न सोसायटीने मदतीचा […]

पवई लेक होममधील भीषण आगीत ७ लोकांचा मृत्यू, २२ पेक्षा जास्त जखमी
पवई लेक होम, फेज तीन मधील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर शनिवारी ५.३० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, एका महिलेसह ७ जणांचा मृत्यू झाला असून २२ पेक्षा जास्त लोक जखमी असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगितले जात आहे. मृतांपैकी तीन जणांचा मृत्यू हा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरून झाला आहे. एका जखमीला ऐरोली येथील नॅशनल बर्न्स सेंटर येथे उपचारार्थ हलविण्यात आले […]

यंग इन्वायरमेंटचा झाडे लावा झाडे जगवाचा नारा, हजारो चिमुकल्या हातांना वृक्षारोपणाचे धडे
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या पवईच्या यंग इन्वायरमेंट ग्रुपच्यावतीने, लहानग्यांना पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे धडे देण्यासाठी “या झाडे लावूया” या उपक्रमाचे आयोजन हिरानंदानीच्या हेरीटेज गार्डनमध्ये ५ जूनला संध्याकाळी ४.३० वाजता करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने बालक-पालक अशी जोडी या उपक्रमात सहभाग नोंदवणार आहे. माणसाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास […]

रहेजाकरांची पर्यावरणाला अनोखी भेट, भित्तिचित्रातून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने रहेजा विहार कॉपेरेटीव हौसिंग सोसायटी असोसिएशन (आर.वी.एस.ए.) आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी आरयूआर ग्रीनफिल्ड संस्थेतर्फे कॉम्प्लेक्समध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी स्थानिक लोकांनी भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून पर्यावरणासंबंधी आपल्या भावना व्यक्त करून या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. लहानग्यांचे या […]

आजाराला कंटाळून हिरानंदानीत घरकाम करणाऱ्या मुलीची आत्महत्या
हिरानंदानीतील हेरिटेज इमारतीत घरकाम करणाऱ्या श्रद्धा गायकवाड (बदलेले नाव) या १९ वर्षीय मुलीने आजाराला कंटाळून तेराव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिल्याची घटना पवईमध्ये काल सकाळी घडली. पवई पोलिसांना ती काम करत असलेल्या घरात तिने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली असून, तिने निराशेतून आत्महत्या केली असल्याचे चिठ्ठीतून समोर येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या आत्महत्येमुळे मात्र […]

पवईचा अवलिया: मुकेश त्रिवेदी, चित्रकार ते छायाचित्रकार एक प्रवास
सुषमा चव्हाण | sush0705@gmail.com लोकांचा मित्र, गुरु, मास्टर छायाचित्रकार, भाऊ, एक उत्तम मार्गदर्शक, छाया-पत्रकार, कलाकार अशी विविध विशेषणांनी ज्यांना संबोधले जाते, असे विविधांगी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मुकेश त्रिवेदी उर्फ मुकी आणि सगळ्या पवईकरांचे लाडके दादा. लहानपणी शाळेत असताना चित्रकलेची आवड असणारा बाल-चित्रकार ते प्रख्यात छायाचित्रकार असा प्रवास करताना कॅमेऱ्याच्या पाठीमागे राहून सुद्धा लोकांच्या मनात घर करून राहिलेला हा पवईचा अवलिया. एकेकाळी जंगल, डोंगराळ, खाणीचा […]

बालगुन्हेगाराच्या नातेवाईकांचा, बालसुधारगृह प्रशासनावर कारवाईच्या मागणीसाठी पोलिस स्टेशनवर मोर्चा
पवई मिलिंदनगरमधील बालगुन्हेगाराचा बालसुधारगृहात झालेल्या मारहाणीनंतर, नायर रुग्णालयात मृत्यू झाला आहे पवईच्या मिलिंदनगर म्हाडा वसाहतीमध्ये राहणारा १७ वर्षीय आमिर जमील अहमद खान, या बालगुन्हेगाराचा नायर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. चोरीच्या गुन्ह्यात पकडले गेल्यानंतर त्याला माटुंगा येथील डेव्हिड बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. तिथे असणाऱ्या इतर बालगुन्हेगारांनी केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. जामिनावर घरी परतल्यानंतर […]

साकिनाका पोलिस वसाहतीत, बारावीच्या परिक्षेत नापास झाल्याने मुलीची आत्महत्या
काल आलेल्या बारावीच्या परिक्षेच्या ऑनलाईन निकालानंतर आपण नापास झालो आहोत हे समजताच साकिनाका पोलिस वसाहतीत राहणारी संध्या पवार (बदललेले नाव) हिने निराशेतून आपल्या राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिचे वडील पोलिस खात्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. आत्महत्येच्या वेळेस संध्याच्या बहिणीने तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता; परंतु तिचा हात झटकून देत उडी मारली. या […]

कोणीही उठतो आणि हात टाकतो, पोलिसांनी करायचे तरी काय?
भायखळा: मोबाईल हरविल्याच्या कारणावरून दोन केनियन नागरिक आणि कॅन्टीन कर्मचाऱ्यांमध्ये झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एका रेल्वे पोलिसाला (जीआरपी) केनियन नागरिकाकडून काठीने मारहाण. घाटकोपर: मोटारसायकलवरुन जाणाऱ्या तिघांना जाब विचारल्याच्या क्षुल्लक वादातून तीन पोलिसांना बेदम मारहाण. वाशी: भरधाव वेगात कार चालवत असणाऱ्यांना थांबवले म्हणून मारहाण. वाकोला: आरोपींना कारागृहात घेऊन जात असताना पोलिसांना मारहाण. पवई: नशेत असणाऱ्या विदेशी नागरिकास हटकले म्हणून पोलिसांशी धक्काबुक्की, भरदिवसा भर रस्त्यात घातला धुमाकूळ, पोलिसांना वापरले अपशब्द. […]