घटनास्थळ

पवई येथील चिमुरडीच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक

तुंगागाव येथील चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी रवी सोलंकी (२१) व इरफान (२१) अशा दोघांना आज (शनिवारी)अटक केली असून, अंधेरी कोर्टात दोघांना सादर करण्यात आले असता त्यांना अधिक तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे. आजी-आजोबा आणि आत्यासोबत पवईतील साकिविहार रोडवरील तुंगागाव मुरली चाळीत […]

Continue Reading 3
घटनास्थळ

तुंगा परिसरातून हरवलेल्या लहान मुलीचा सापडला मृतदेह

तुं गा परिसरातून गायब झालेल्या श्रीया अजय मेश्राम, हिचा मृतदेह आज (बुधवारी) दुपारी १ वाजता तुंगा परिसरातील कृष्णा बिजनेस पार्क भागातील झाडीत, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या टाकीत आढळून आला आहे. रविवार रात्री ११ पासून तुंगागाव, साकीविहार रोड परिसरातून श्रीया गायब होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात घेऊन जाण्यात आला असून, पोलिसांनी अपहरण, बलात्कार, हत्या व पोस्का […]

Continue Reading 0
iit fire

आयआयटी कॅम्पसमध्ये किरकोळ आग

आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये मंगळवारी संध्याकाळी किरकोळ आग लागल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी बनवलेल्या वस्तीगृहाच्या पाठीमागील बाजूस भंगार साठवून ठेवण्याच्या ठिकाणी ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या एका इंजिनच्या मदतीने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मंगळवारी संध्याकाळी ५.२५ वाजण्याच्या सुमारास कॅम्पसच्या आतील भंगार, कचरा साठवून ठेवण्याच्या ठिकाणी […]

Continue Reading 0
accident

आयआयटीत कारच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

सकाळी रस्त्याने चालत जाणाऱ्या एका मासे विक्रेत्यास आयआयटी, चैतन्यनगर सर्कलवर कारने धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत पवई पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवण्याच्या गुन्ह्यात गाडी चालक श्रीमती खंडेलवाल याना अटक केली असून, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी फुलेनगर येथे राहणारे धिराव प्रसाद (६५) हे मासे विक्रीचा व्यवसाय करतात. […]

Continue Reading 0
laptop chor

पवईत कारमधून लॅपटॉप, आयपॅड चोरी

पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप आणि आयपॅड चोरीस गेल्याची घटना काल पवईमध्ये घडली आहे. याबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे पार्किंगमध्ये गाड्या लावणाऱ्या मालक व चालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार हेमंतकुमार तरवरे हे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता पवईत कामानिमित्त आले होते. कामाच्या […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक

बांधकाम साईटवर सुरक्षारक्षकाचा २० फुट खड्यात पडून दुर्दैवी मृत्यू

गणेशनगर, पंचकुटीर भागात चालू असणाऱ्या बांधकाम साईटवर ५५ वर्षीय सुरक्षारक्षकाचा २० फुट खोल खड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विश्वनाथ वामन शेंडगे (५५) असे मृत्यू पावलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेवून, पवई पोलिसांनी अग्निशमन दलाच्या साहय्याने जखमीला बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. […]

Continue Reading 0
iit bus stop issue

आयआयटीचे बस स्टॉप हलवले, पण नक्की कोणासाठी? – संतप्त नागरिक

जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवरील आयआयटी मेनगेट येथील जोगेश्वरीच्या दिशेने जाणारा बेस्ट बस स्टॉप वाहतुकीला अडथळा आणत असल्याने, १ तारखेपासून आयआयटी मेनगेट पादचारी पुलाजवळ हलवण्यात आला आहे. बस स्टॉपला हलवले गेल्याने येथील स्थानिकांना रहदारीतून रस्ता काढत लांब बस स्टॉपवर जावे लागत आहे. यामुळे हा बस स्टॉप नक्की नागरिकांच्या सेवेसाठी हलवला आहे? की व्यावसायिकाला होणाऱ्या अडचणीला […]

Continue Reading 0
crime1

शाळेत विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन, विद्यार्थ्याचे १५ दिवसासाठी निलंबन

पवईमधील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने अश्लील वर्तन केल्याची घटना घडली आहे. याबाबत कठोर पाऊले उचलत शाळेने संबंधित विद्यार्थ्याचे १५ दिवसांसाठी शाळेतून निलंबन केले आहे. शाळा आणि घरातील वातावरणात मुलांवर अनेक सुसंस्कार घडत असतात, मात्र सहज उपलब्ध असणारी अनेक माध्यमे व आई-वडील दोघीही नोकरी करत असणाऱ्या परिवारात अनेकदा मुले […]

Continue Reading 0
ambedkar garden

डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान उदघाटनाच्या प्रतीक्षेत

रविराज शिंदे पवई तलाव आणि परिसर हे मुंबईकरांच्या पर्यटन स्थळाच्या यादीतील महत्वाचे ठिकाण आहे. या भागात सौंदर्यीकरण प्रकल्प राबवल्यापासून हा भाग मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला असतानाच, पवईतील एल-अँड-टी समोरील २२ एकर जागेवर विस्तारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मात्र अजूनही उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी १७ कोटीं रुपयांचा खर्च पालिकेतर्फे करण्यात आला असून, या […]

Continue Reading 0
prasiddhi patra

जलवाहिनी  मंजुरीवरून शिवसेना-राष्ट्रवादीत श्रेयवाद

“परिसरातील पाण्याच्या समस्येचा पाठपुरावा मी शिवसेना शाखाप्रमुख या नात्याने गेली अनेक महिने करत आहे. या संपूर्ण मंजुऱ्या या शिवसेनेच्या पाठपुराव्यातून झालेल्या आहेत आणि याचे संपूर्ण श्रेय हे शिवसेनेचेच आहे. याचे श्रेय लाटू इच्छिणाऱ्यांनी पाठपुराव्याचे पुरावे द्यावेत” – निलेश साळुंखे – शाखाप्रमुख ११५. “शाखाप्रमुख हे मंजुरीच्या स्तरावर असणाऱ्या प्रकल्पांची माहिती मिळवून पत्रव्यवहार करून नेहमीच श्रेय लाटण्याचा […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes