आम्हाला आमची संस्कृती जपायची आहे, आम्हाला मराठी शाळेत शिकायचे आहे. असे म्हणत हजारोच्या  संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी शाळा तोडायला आलेल्या प्रशासनाच्या विरोधात जनांदोलन केले

शाळा तोडण्याच्या नोटीसीच्या विरोधात विद्यार्थी, पालक रस्त्यावर

एकीकडे राज्य सरकार सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करीत असतानाच, दुसरीकडे मात्र गुरुवारी चांदिवलीमधील संघर्षनगर भागातील कुशाभाऊ सेठ बांगर विद्यालय, या मराठी शाळेला ती अनधिकृत ठरवून तोडण्यासाठी प्रशासन पोलिसांचा फौजफाटा घेऊन पोहचले होते. इंग्रजी शाळेचा स्तोम वाढत असतानाच, मराठी शाळा मात्र बंद पडत आहेत. आम्हाला आमची संस्कृती आणि मराठी शाळा दोन्ही वाचवायचे आहे, म्हणून […]

Continue Reading 0
HNG drainage issue

हिरानंदानीकरांचा प्रवास गटाराच्या पाण्यातून, शाळेतील मुले पडत आहेत आजारी

हिरानंदानी येथील ओर्चीड एव्हेन्यू रोडवरील हिरानंदानी स्कूल शेजारील गटाराचे घाण सांडपाणी संपूर्ण रस्त्यावर पसरत असल्याने, पवईकर आणि खास करून हिरानंदानी परिसरातील नागरिकांना गटाराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. शेजारीच असणाऱ्या हिरानंदानी शाळेतील मुले आजारी पडत असल्याबाबत मुलांच्या पालकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. “आम्ही कारण शोधून काढले असून काम सुरु केले आहे. २ दिवसापूर्वी सुरु झालेल्या […]

Continue Reading 0
FOB HNG fnl

पवईतील पादचारी पूल नक्की कोणासाठी? पुलावर भिकारी, गर्दुल्यांचे अतिक्रमण

पवई येथील हिरानंदानी बसस्थानक पादचारी पुलावर गेल्या काही महिन्यांपासून भिकारी, गर्दुले यांनी अतिक्रमण केले आहे. या पुलावर छेडछाड, चोरीच्या घटना घडू लागल्याने आता पादचाऱ्यांनी या पुलाचा वापर करणेच टाळले आहे. ही केवळ याच नाही तर पवईमधील बऱ्याच पादचारी पुलांची अवस्था आहे. या संदर्भात स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी मनपा प्रशासन व पवई पोलिसांना लेखी […]

Continue Reading 0
dr

सुकृतः फाऊन्डेशन – गरिब गरजूंना मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक गोष्टी देणारी संस्था

माझ्या प्रत्येक कृतीतून मला फायदा कसा होईल, या विचाराने वागणाऱ्या समाजात. आपल्याला प्रत्येक कार्यात मदत करणाऱ्या, गरीब आणि गरजू अशा घरकाम करणाऱ्या स्त्रिया, त्यांचा परिवार, अनाथ, रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा देण्याचे काम, पवईमधील रहेजा येथील सुकृतः ही संस्था करत आहे. एवढ्यावरच न थांबता ही संस्था, या लोकांसाठी चांगले काहीतरी करा म्हणून लोकांना […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवई तलावात बुडून लाइफ गार्डचा मृत्यू, अति-आत्मविश्वास पडला महागात

पवई तलावात मस्ती करता करता एका 27 वर्षाच्या मुलाचा बूडन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी संध्याकाळी पवई तलावात घडली. मृत युवकाचे नाव विलास कडव असे असून, तुंगा गांव येथील रहिवाशी आहे. पवई तलावातील कचरा काढ़णे, गणेश विसर्जन करणे आणि लाइफगार्ड म्हणून तो काम करायचा. शनिवारी आपल्या मित्रांसोबत तलावावर असताना श्वास रोखून पाण्यात बुडून राहण्याचा खेळ […]

Continue Reading 0
pl2

पवई तलाव बत्ती गुलची तक्रार पोहचली हॉटलाईनवर, त्वरित दिवे चालू करण्याचे शिवसेना भवनातून आदेश

मरीन ड्राईव्ह येथील क्वीन नेक्लेसच्या धर्तीवर करोडो रुपये खर्च करून पवई तलाव परिसरात सुशोभिकरण करून पदपथावर लावलेले दिवे, गेले एक महिने बंद पडले आहेत. याची तक्रार जल अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांच्याकडे पवईकरांकडून वारंवार करून सुद्धा, पदपथावरील दिवे चालू झाले नाहीत. शेवटी कंटाळून पवईकर नागरिकांनी महानगरपालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेने तक्रार नोंदवण्यासाठी सुरु केलेल्या हॉटलाईनवर याबाबत तक्रारी […]

Continue Reading 0
BEST_bus_accident_295

साकिनाका भागात बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, संतप्त जमावाकडून बसची तोडफोड

साकिनाका येथील टिळकनगर भागात गर्दीने गजबजलेल्या रस्त्यांवरून बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान, बस क्रमांक ३३१ रस्ता काढत निघत असताना, ३२ वर्षीय इसमाचा बसखाली येऊन मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जमा झालेल्या जमावाने रागाच्या भरात बसची तोडफोड करण्यास सुरवात केली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवत बस चालकाला ताब्यात घेवून वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले. प्रत्यक्षदर्शींनी […]

Continue Reading 0
police public meet

पवईमध्ये पोलीस, जनता आणि गुन्हेगारी निर्बंध या विषयावर चर्चासत्राचे आयोजन

पोलीस आणि जनता हे एकमेकांचे मित्र आहेत. एकमेकांच्या साथीने गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालू शकतात. यासाठी जनता आणि पोलीस एकत्रित यावे म्हणून, आयआयटी पवई येथील जैन मंदिर सभागृहात पोलीस, जनता आणि गुन्हेगारी निर्बंध या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पवई पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर, साकिनाका विभागाचे सहाय्यक […]

Continue Reading 0
lake primrose

१६ सीसीटीव्हीच्या सुरक्षा कवचाला भेदून लेक होममध्ये घरफोडी, ६ लाखाचा ऐवज लंपास

चांदिवली येथील लेक होम, लेक प्रिमरोज या इमारतीत राहणारे व्होरा कुटुंबिय घरात नाहीत याचा फायदा घेत, घराचा दरवाजा बोगस चावीच्या मदतीने खोलून घरातील ६ लाख रुपये किमतीच्या ऐवजावर अज्ञात चोरट्यांने हात साफ केला आहे. संपूर्ण सोसायटीला असलेल्या १६ सीसीटीव्हीच्या सुरक्षा कवचाला भेदून चोरट्यांने ही चोरी केली आहे. याबाबत पवई पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद करून तपास चालू […]

Continue Reading 0
arrest

साकिनाका मॉडेल रेप केस: गुन्ह्यामध्ये सी ग्रेड चित्रपटाच्या सहाय्यकाला अटक

एप्रिल महिन्यात एका मॉडेलवरील झालेल्या रेप आणि खंडणी प्रकरणात, साकिनाका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल खाटपे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश सुर्यवंशी आणि पोलिस शिपाई योगेश पोंडे सह एकूण आठ जणांना मुंबई पोलिसांच्या एमआयडीसी गुन्हे शाखेने अटक केली होती. यातील फरार दाखवण्यात आलेल्या आरोपींपैकी, सी ग्रेड चित्रपटातील सहाय्यक सिकंदर मिर्झा उर्फ राजू (३२), याला चार […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes