c

पवई तलावाचे झाले गटार, निसर्गप्रेमी चिंतेत

करोडो रुपये खर्च करून सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या पवई तलावातील पाण्यात आसपासच्या परिसरातून गटाराचे पाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळे तलावातील पाणी दुषित होत असून, तलावात घाणीचे साम्राज्य पसरून तलावाचे रूपांतर हळूहळू गटारात होत आहे. संपूर्ण पवई तलावाच्या परिसरातून जाताना लोकांना येथून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नाकावर रूमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे. मुंबईकर राजेश पिल्लाई यांनी फोन आणि […]

Continue Reading 1
fitnes centre

पवईत लवकरच ‘ओपन जिम’

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्वसामान्यांसाठी ओपन जिमची आधुनिक संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेनुसार पवईमध्ये सुद्धा अशाच प्रकारची ओपन जिम निर्माण केली जावी म्हणून शिवसेना पुढे आली असून, शिवसेना शाखा ११५ चे शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी हिरानंदानी समूहाच्यावतीने पालिकेला नुकत्याच हस्तांतरीत करण्यात आलेल्या पालिका उद्यानात पवईकरांसाठी ओपन जिम तयार करण्याची मागणी केली आहे. लवकरच या […]

Continue Reading 1
2let

पालिका उद्यानातील शौचालय गेले चोरीला

हिरानंदानी येथील आंब्रोसिया इमारतीच्या बाजूला असणाऱ्या पालिका उद्यानात बांधण्यात आलेले शौचालय मलनिसारण वाहिनीला जोडले गेले नसल्याने ते वापरात नसून, त्याचे गोडाऊन झाले आहे. त्यामुळे या उद्यानातील शौचालय चोरीस गेले कि काय? अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. याबाबत पुढाकार घेत शिवसेना शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करत लवकरात लवकर शौचालय मलनिसारण वाहिनीला जोडून जनतेसाठी खुले […]

Continue Reading 1

३८ लाखांच्या ‘एमडी’ अंमली पदार्थासह पवईतील एकाला अटक

अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या तीन इसमांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने टागोरनगर, विक्रोळी येथून ३८ लाखांच्या ‘एमडी’ या अंमली पदार्थासह अटक केली आहे. अटक तीन आरोपींमधील एक इसम हा पवई भागातील रहिवाशी असून, यात एका महिलेचा सुद्धा समावेश आहे. हा साठा त्यांनी कुठून आणला व कोणास विकणार होते? याचा पोलिस आता शोध घेत आहेत. विक्रोळी येथील […]

Continue Reading 0
asd

१३ लाखाची चोरी करून पसार झालेल्या कुकला रांचीमधून अटक

हिरानंदानी येथील व्यावसायिकाचे १३ लाख रुपये घेऊन पसार झालेल्या कुक (स्वयंपाकी) व साथीदाराला रांची येथून पकडण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. अनिल कुमार दास (२७) व दिनेश क्रीपलाल दास (२८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अनिल हा तक्रारदाराच्या घरी स्वयंपाक बनवण्याचे काम करत होता. क्राईम पेट्रोल कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन त्याने ही चोरी केली असल्याचे पोलीस […]

Continue Reading 0
ac bus

ए-७५ एसी बसच्या बंदीला स्थगिती, फेऱ्या सुरळीत सुरु

हिरानंदानी गार्डन, पवई ते वरळी मार्गावरील ए-७५ या वातानुकूलित बसला मिळणारा अल्पप्रतिसाद व खर्चाच्या प्रमाणात मिळणारे उत्पन्न अतिशय कमी असल्याने, बेस्टच्या तोटय़ात आणखी भर पडू नये यासाठी १ मे २०१६ पासून या मार्गावरील वातानुकूलित सेवा बंद कण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांनी याला कडाडून विरोध दर्शवल्याने व राजकीय […]

Continue Reading 0
pawar tayde shivsena

दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदिवलीत आज (शुक्रवारी) एक मोठा बदल घडला असून, माजी नगरसेवक (वार्ड क्रमांक १५०) व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चांदिवली तालुका अध्यक्ष शरद पवार आणि मनसे चांदिवली विभाग अध्यक्ष व नगरसेवक ईश्वर तायडे (वार्ड क्रमांक १५१) यांनी शिवसेना विभागप्रमुख आमदार संजय भाई पोतणीस यांच्या मार्गदर्शनामध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या […]

Continue Reading 0
suicide

आयआयटी कॅम्पसमध्ये प्रोफेसरच्या मुलीची आत्महत्या

आयआयटी कॅम्पसमधील केंद्रीय विद्यालयात बारावीत शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीने कॅम्पसमध्येच असणाऱ्या शिवालिक इमारतीच्या १४व्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे वडील हे आयआयटीमध्ये प्रोफेसर असल्याचे बोलले जात आहे. सरोजा नांबियार (बदललेले अडनाव) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. पवई पोलिसांनी याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला […]

Continue Reading 0
molestation

बसमध्ये अश्लील चाळे करणाऱ्याला रणरागिनीचा दणका, केले पोलिसांच्या हवाली

बसमधून प्रवास करताना अठरा वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या एका विकृताला त्या रणरागिनीने चांगलाच इंगा दाखवला आहे. सहप्रवाशांची साथ मिळत नसतानाही तिने धाडस करून त्याला धरून पवई पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत पोलिसांनी आरोपी अशोक नलवे (४३) यास भादवी कलम ३५४ अन्वये गुन्हा नोंद करत अटक केली आहे. गोरेगाव येथील एका नामांकित कंपनीत प्रशिक्षण घेत […]

Continue Reading 0
tree colaps1

अलिशान इमारतीसाठी चांदिवलीत ६५ झाडांवर कुऱ्हाड

चांदिवली येथील डी मार्ट जवळील मोक्याच्या ठिकाणी एका नामांकीत विकासकाच्या उभारण्यात येणाऱ्या गगनचुंबी इमारती आड येणारी तब्बल ६५ झाडांची कत्तल करण्याची परवानगी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने दिली आहे. यामध्ये आंबा, नारळ, चिकू पेरू आदी झाडांचा समावेश आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे विकासकाला आलिशान इमारती उभारण्यामधील अडसर दूर झाला असला तरी स्थानिक पर्यावरण प्रेमी याला आपला […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes