पॉज मुंबईतर्फे प्राणीमित्रांचा सन्मान

पॉज मुंबईचे संस्थापक, तसेच मानद जिल्हा प्राणी कल्याण अधिकारी सुनीष सुब्रमण्यम प्राणीमित्र रूपा अंबर्ले यांचा सन्मान करताना

पॉज मुंबईचे संस्थापक, तसेच मानद जिल्हा प्राणी कल्याण अधिकारी सुनीष सुब्रमण्यम प्राणीमित्र रूपा अंबर्ले यांचा सन्मान करताना

मुंबई स्थित स्वयंसेवी संस्था प्लांट अँड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटी (पॉज) आणि अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) यांच्यातर्फे वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण ब्यूरो (डब्ल्यूसीसीबी) पश्चिम विभागाचे उपसंचालक एम मारंको, डब्ल्यूसीसीबी कॉन्स्टेबल सप्पन मोहन आणि प्राणीमित्र रूपा अंबर्ले यांना त्यांच्या कार्याबद्दल कौतुक प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. औचित्य होते ते पशु कल्याण पंधरवडा २०२० कार्यक्रमाचे.

पॉज मुंबई आणि एसीएफतर्फे वेलफेअर पंधरवड्या २०२० पशु कल्याण पुस्तिकेचे प्रकाशन सुद्धा यावेळी करण्यात आले. पोलीस दलातील आयपीएस अधिकारी कैसर खालिद, विशेष महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

आयपीएस (भापोसे) अधिकारी कैसर खालिद विशेष महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पॉज मुंबईच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करताना

आयपीएस (भापोसे) अधिकारी कैसर खालिद, विशेष महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पॉज मुंबईच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करताना

“हे सर्व पोलिस ठाणे व प्राणी प्रेमींना मोफत वाटप केले जाईल,” असे पॉज मुंबई आणि एसीएफ या स्वयंसेवी संस्थांच्या सह-संस्थापक निशा कुंजू यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तिने माहितीपत्रकाबद्दल सांगताना म्हटले की, “क्रूरतेपासून प्राण्यांच्या बचावासाठी कायदा १९६०, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२, भारतीय दंड संहिता १९८०, मुंबई पोलिस कायदा १९६१ या सारख्या अनेक कायद्यांची माहितीचा या माहितीपत्रकात समावेश केला आहे.”

पॉज मुंबईचे संस्थापक, एसीएफ तसेच मानद जिल्हा प्राणी कल्याण अधिकारी सुनीष सुब्रमण्यम यांनी याबाबत बोलताना सांगितले की, यापूर्वी देखील त्यांनी प्राणीमित्र नवशीर मिर्झा, रेंज फॉरेस्ट ऑफिसर दर्शन ठाकूर आणि युवराज गिते यांचा गौरव केला आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!