अंध विद्यार्थ्यांसाठी मदतीचा ‘आवाज’

studentsअंध विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांच्या ‘आवाज’ उपक्रमास पवई इंग्लिश हायस्कूलच्या १९ विद्यार्थ्यांनी आपला आवाज देत त्यांच्या शिक्षणाट मोलाचा वाटा उचलला आहे. विद्यार्थ्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील कविता आणि गोष्टी रेकॉर्ड केल्या आहेत. अंध विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे.

अंधांमध्ये ‘दृष्टी’ नसली तरी ‘दृष्टिकोन’ असतो. एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा ते भरभरून बोलतात तेव्हा चाट पडायला होते. ज्ञानार्जनाची भूक त्यांच्यात मोठी असते, मात्र साधनांच्या अभावामुळे मर्यादा येत असतात. ब्रेल लिपीत त्यांच्यासाठी पुस्तके उपलब्ध असली तरी ती पुरेशी नाहीत. जन्मतः अंधत्व असेल तर मुले पूर्वीपासून शिकत असल्याने ब्रेल लिपी लवकर शिकतात, मात्र अचानक काही घटनेमुळे अंधत्व आलेल्या मुलांना ते अवघड जाते. अशात ध्वनिमुद्रित माध्यमातून त्यांना शिक्षण देणे अगदी सोपे आहे. हाच दृष्टीकोन समोर ठेवत आयआयटीच्या रिषभ बोहरा आणि ईशान रक्षीत यांनी विद्यार्थ्यांच्या आवाजात अभ्यासक्रम ध्वनिमुद्रित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

IIT Studentsया उपक्रमात पवई इंग्लिश हायस्कूलच्या नववी आणि दहावी इयत्तेत शिकणाऱ्या १९ विद्यार्थ्यांनी आपल्या आवाजात हिंदी आणि इंग्रजी भाषेत कविता ध्वनिमुद्रित करून या उपक्रमात आपला सहभाग दिला आहे.

“विद्यार्थी हे विद्यार्थीच असतात, मग ते अपंग असो वा सक्षम, सर्वांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे. अंधत्व आलेल्या मुलांच्या शिक्षणात आमचे विद्यार्थी देत असलेली ही देणगी अतुल्य आहे. ज्ञान दिल्यानेच वाढते”, असे आवर्तन पवईशी बोलताना पवई इंग्लिश हायस्कूलच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शिरली पिल्लाई यांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!