हिरानंदानीतील खेळाच्या मैदानाला स्टेडियमच रूप

हिरानंदानी गार्डन्स, पवई येथील खेळाच्या मैदानाला स्टेडीअमच रूप देण्यात येणार आहे. चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या प्रयत्नातून हे काम करण्यात येत आहे. या कामाचे उद्घाटन मंगळवारी हिरानंदानी येथे पार पडले. पालिका येत्या महिन्याभरात या खेळाच्या मैदानाचे रुपडे पालटणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी आमदार दिलीप लांडे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक १२२चे शाखाप्रमुख शिवा सूर्यवंशी, महिला शाखाप्रमुख अलका फडतरे, रिद्धी सिद्धी महिला संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी, युवासेना शाखाप्रमुख शैलेश पवार, अनिल भदरगे, राजेंद्र जाधव, समाजसेविका अनिता सिंग, सुरेश अग्रवाल, ज्योती सिंग आणि पालिका अधिकारी उपस्थित होते.

उंच उंच इमारतींचे साम्राज्य असणाऱ्या पवई परिसरात मुलांसाठी खेळाच्या मैदानांचा तुटवडा नेहमीच जाणवत आला आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच काही मोकळ्या जागा, खेळाची मैदाने म्हणून राखीव आहेत. काही मैदाने शाळेने आपल्या आवारात घेवून तेथे बाहेरील मुलांना येण्यास मनाई केली होती. ती मैदाने शिवसैनिकांनी पालिका आणि स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करत परत मिळवून सामान्य नागरिकांसाठी खुली केली आहेत. मात्र या उपलब्ध मैदानात झालेल्या पडझड आणि चालणाऱ्या हुल्लडबाजीमुळे मुलांना खेळायला अडचणी येत आहेत. हिरानंदानीतील भूमापन क्रमांक १३ डी (ईडन मैदान) येथील मैदानात देखील दुरुस्तीची गरज भासत होती. याचीच दखल घेत आमदार लांडे यांच्या प्रयत्नातून पालिकेतर्फे या मैदानाच्या डागडूजीच्या कामाच्या सुरुवातीचा नारळ मंगळवारी फोडण्यात आला.

“मैदानाला विविध खेळांच्या अनुषंगाने तयार करण्यासोबतच खेळ बघायला येणारे प्रेक्षक आणि इतर खेळाडू यांच्या दृष्टीकोनातून या मैदानाला स्टेडीअमच्या धर्तीवर बनवण्यात येणार आहे. यात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या सुरक्षा भिंतींची उंची ४ फुटापर्यंत वाढवणे. मैदानाच्या कडेला सिमेंटीकरण केलेला भाग समतोल, एकाच उंचीचा करणे, पडझड झालेल्या ठिकाणची दुरुस्ती करणे, मैदानाच्या समोरील भागास स्टेज सारखे बनवणे, मैदानात पाणी साचणार नाही अशी सोय करणे अशा काही कामांच्या माध्यमातून हे मैदान मुलांना खेळण्यायोग्य बनवण्यात येणार आहे” असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या मैदानात ओपन जिम आणि लहान मुलांना खेळण्यासाठी वस्तू देखील बसवण्यात आल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करणे किंवा आवश्यकता वाटल्यास बदलण्याचे काम देखील या कामाच्या वेळेत करण्यात येणार आहे.

, , , , , , , , ,

One Response to हिरानंदानीतील खेळाच्या मैदानाला स्टेडियमच रूप

  1. Dr Sunita khedekar February 4, 2023 at 12:18 pm #

    लांडे तुम्ही कृष्णांग ते चांदवलीला जाणारा रस्ता व डागडुजी अर्धवट ठेवली आहेत , आय आय टी काम्लेक्स चा रोड जबरदस्त खराब झाला आहे . त्याकडे लक्ष देणे जरुरी आहे , सिनीअर सिटिझन्स व चालणार्या लोकांची तसेच वाहने चालवणे मुश्कील होतेय , फार मोठे काम नाही हे .. करावे ही विनंती 🙏🏼

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!