कविता: आकाशाच्या मैदानात

आकाशाच्या मैदानात भरला होता मेळा

सूर्य बोले बाळांनो रे चला आता खेळा

वारा बोलला खेळूया शिवाशिवीचा डाव

प्लुटो आणि नेपचून जाऊन दूर लपले राव

पृथ्वी बोलली माझ्याकडे आहे खूप पाणी

मी तर खेळीन एकटीच गोल गोल राणी

चंद्र बोलला लपाछुपी मी रोज रोज खेळतो

ढगामागे लपतो आमवशेला गायब होतो

तेवढ्यात आला धूमकेतू शेपूट त्याची लांब

माझ्याशीच शर्यत माझी नका बोलुत थांब

अकरा चंद्र माझी टीम खेळीन मी क्रिकेट

गुरू बोलला सगळ्यांची मी घेईन विकेट

शुक्र बोले चांदणी मी छम छम नाचते

सर्वांआधी आकाशात चमचम चमकते

शनी बोलला रिंगेला मी गरगर फिरवतो

कंबरे भोवती विळखा देऊन गोल गोल घुमवतो

मंगळ बोले मित्रांनो मी रोज खेळतो कुस्ती

तांबड्या मातीत लोळून लोळून खूप करतो मस्ती

रात्र सरली पहाट झाली सूर्य पुन्हा आला

पुरे झाला खेळ मुलांनो चला घरी पळा….

– अमित द्वारकानाथ खोत

शिक्षक पवई इंग्लिश हायस्कूल

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!