साकिनाका पोलीस ठाण्यात साजरा झाला तक्रारदाराचा वाढदिवस

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी व जनतेमध्ये पोलिसांच्या बाबतीत विश्वास संपादन करण्यासाठी मुंबई पोलीस सतत कार्य करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. साकिनाका पोलिसांनी सुद्धा असेच एक उदाहरण स्थापित केले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आलेल्या व्यक्तीचा आज वाढदिवस आहे हे समजताच पोलिसांनी त्याची तक्रार लिहून तर घेतलीच, सोबत पोलीस ठाण्यातच केक कापून त्याचा वाढदिवस सुद्धा साजरा केला.

साकीनाका परिसरात राहणारे अनिष जैन हे साकीनाका पोलीस ठाण्याला तक्रार देण्यासाठी आले होते. तक्रार करत असताना अनिषने दिलेल्या माहितीनुसार त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस असल्याचे कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी केक मागवून पोलीस ठाण्यातच वाढदिवस साजरा करत अनिषला एक सुखद धक्का दिला.

साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या करण्यात आलेल्या वाढदिवसाची माहिती मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट होताच, जवळपास ४ लाख फॉलोअर्स असणाऱ्या या अकाऊंटवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा आणि पोलिसांच्या कार्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत होता.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes