पवईला सीसीटीव्हीची सुरक्षा; विविध ठिकाणी १०० सीसीटीव्हीची नजर

अनलॉक सुरु झाले आणि तीन महिने शांत असलेल्या गुन्हेगारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. परिसरात वाढत्या चोऱ्यांना पाहता स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या प्रयत्नातून पवई परिसरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरु आहे.

पाठीमागील काही दिवसात मुंबईत पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढली असून, पवई परिसरात चोरी, मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी सारख्या घटना वाढलेल्या आहेत. चोरटे सापडेल ते चोरी करून पळ काढत आहेत. अंधाराचा फायदा घेवून जबरी चोरीचे गुन्हे सुद्धा घडत असल्याने कायदा सुव्यवस्थेसोबतच गुन्हेगारीला आळा घालण्याचे एक मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या सगळ्यांचा विचार करता पाटील आणि त्रिपाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पाठपुरावा करत होते.

“आमच्या पाठपुराव्याला यश आले असून, पालिकेतर्फे मंजुरी मिळवत एका खाजगी कंपनीच्या मदतीने आम्ही परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे सीसीटीव्ही लावण्यास सुरुवात केली आहे,” असे याबाबत बोलताना नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी सांगितले.

या उपक्रमानुसार सुरुवातीच्या काळात आयआयटी रहिवाशी भागातील चौक आणि मुख्य बाजार भागासह, चंद्रभान शर्मा सर्कलवर सीसीटीव्ही लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, नजर ठेवण्याचे काम सुरु आहे. येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण पवई भागासह पवई तलाव विसर्जन घाटांवर मिळून २८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. पवई पोलीस ठाण्यातून या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.

“वाढत्या गुन्हेगारीला पाहता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज वाढली होती. बसवल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारी रोखण्यासोबतच गुन्हे उघडकीस खूप मोठी मदत होणार आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (प्रभारी) विजय दळवी यांनी सांगितले.

विजय भामरे सहाय्यक अभियंता परिरक्षण विभाग पालिका एस विभाग यांनी यासंदर्भात आवर्तन पवईशी बोलताना सांगितले की, “नगरसेवकांतर्फे परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. पालिकेकडून त्याला मंजुरी देण्यात आली आहे.”

“मोठ्या प्रमाणात नागरिक वाढत्या गुन्हेगारी कृत्यांबद्दल तक्रार करत होते. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज लक्षात घेता आम्ही ते बसवण्यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर आता त्या कामाला सुरुवात झाली आहे,” असे यासंदर्भात बोलताना स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांनी सांगितले.

कॅमेरे सर्व दिशेस कव्हर करत असल्याने कोणताही परिसर याच्या नजरेतून सुटत नाही. बसवलेले कॅमेरे चांगल्या दर्जाचे असल्याने चांगले फुटेज सुद्धा उपलब्ध होत आहेत, असे याबाबत बोलताना काही स्थानिक नागरिक म्हणाले.

इनपुट: रमेश कांबळे

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

One Response to पवईला सीसीटीव्हीची सुरक्षा; विविध ठिकाणी १०० सीसीटीव्हीची नजर

  1. Vbc September 29, 2020 at 6:48 am #

    Good move

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!