बँकेच्या लॉकरमधून २३ लाखाची चोरी

बँकेच्या लॉकरमधून चोरी प्रातिनिधिक छायाचित्र

पवईतील हिरानंदानी येथील एका नामांकित बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलेल्या २३ लाखाच्या मौल्यवान वस्तूंवर अज्ञात व्यक्तींनी हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये हिऱ्यांच्या आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. या संदर्भात चोरीचा गुन्हा दाखल करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील हिरानंदानी येथे राहणारया मिताली शहा (बदललेले नाव) यांचे हिरानंदानीतील डेल्फी इमारतीत असणाऱ्या एका नामांकित बँकेत खाते आहे. याच बँकेत त्यांनी आपल्या घरातील मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी एक लॉकरसुद्धा घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी लोकॅरमधील वस्तूंची पाहणी करताना यातील काही मौल्यवान वस्तू गायब असल्याचे शहा यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी घरात चौकशी केली मात्र कोणाकडेच त्याबाबत माहिती मिळू शकली नसल्याने त्यांनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

“घरातील दोन स्त्रियांकडे या लॉकरमधून सामान काढणे आणि ठेवण्याचे अधिकार आहेत. श्रीमती शहा आणि त्यांची मुलगी दोघी मिळून या लॉकरचे व्यवहार पाहतात. सुरुवातीला यातील काही वस्तू कमी असल्याचे समोर आले तेव्हा कदाचित मुलीने त्या घेतल्या असाव्यात असे शहा यांना वाटल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता बऱ्याच वस्तू लॉकरमध्ये आढळून येत नसल्याने त्यांनी घरात चौकशी केली असता ते चोरीला गेले असल्याचे समोर आले.” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

“आम्ही घरातील सर्व व्यक्तींचे जवाब नोंदवले आहेत केवळ त्या दोघींकडेच त्या लॉकरच्या चाव्या आहेत. शिवाय दोघीच सगळे व्यवहार पाहत असल्याने इतर सदस्य याबाबत अनभिज्ञ आहेत” असेही ते पुढे म्हणाले.

लॉकरसाठी त्यांच्या चावी व्यतिरिक्त बँकेची चावी सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे या चोरीची पद्दत समजणे पोलिसांसाठी आवाहनच ठरत आहे.

“२०१५ पासून आत्तापर्यंतच्या काळात काही हिऱ्याचे, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असे २३ लाखाच्या जवळपास मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. लॉकरच्या दोन्ही चावी व्यतिरिक्त लॉकर उघडत नाही मग चोरट्यांनी ही चोरी कशी केली याचा आम्ही माग घेत आहोत,” असेही पोलिसांनी सांगितले.

मुंबईच्या ऑपेरा हाउस येथे २०११ मध्ये बनावट चावी बनवून लॉकरमधून ४.५ करोडच्या डायमंड चोरीची घटना २०११ला घडली होती. यात तपासात ४ आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र त्या घटनेत विविध लॉकरमधून ही चोरी करण्यात आली होती. तशी काही मोडस ऑपेरेंडी या गुन्ह्यात आहे का? याचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत.

‘परिवारातील सद्स्यांसोबातच आम्ही बँक कर्मचारी आणि आसपासच्या लॉकरधारकांची सुद्धा चौकशी करत आहोत. गुन्ह्याचा कार्यकाळ मोठा आहे एवढ्या मोठ्या काळातील सीसीटीव्ही फुटेज मिळणे थोडे अवघड आहे मात्र आम्ही उपलब्ध सिसिटीव्ही फुटेजच्या आधारावर पुढील तपास करत आहोत” असे याबाबत बोलताना तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!