पवई, गणेशनगर येथे आत्महत्या केलेल्या ४५ वर्षीय इसमाला २५ तासानंतर बाहेर काढण्यात यश

रमेश कांबळे


पवईतील गणेशनगर परिसरातील पडक्या विहीरीत उडी मारून आत्महत्या करणाऱ्या, ४५ वर्षीय मंगेश रामचंद्र मोरे यांचे शव बाहेर काढण्यात आज संध्याकाळी शोध पथकाला यश आले. २५ तासानंतर संध्याकाळी ५.३० वाजता शव बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

गणेशनगर पंचकुटीर येथे राहणारे मंगेश मोरे यांनी मंगळवारी दुपारी रागाच्या भरात घराजवळच असणाऱ्या पडक्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या सहाय्याने संध्याकाळी उशिरापर्यंत शोधकार्य करूनही काहीच हाती लागत नसल्याने, अंधार झाल्यामुळे शोधकार्य बंद करण्यात आले होते.

आज (बुधवारी) सकाळी अग्निशमन साल, एनडीआरएफ आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले होते. दिवसभर चालू असणाऱ्या अथक प्रयत्नानंतर अखेर आत्महत्येच्या २५ तासानंतर संध्याकाळी ५.१५ वाजता शोधकार्याला यश येत मंगेश याचे शव बाहेर काढण्यात आले.

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes