मनसेकडून आदिवासी महिलांना कुकर वाटप

मराठी भाषा निमित्ताने महिलांना ऊर्जा बचतीचे धडे देण्याचे प्रयत्न

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आदिवासी महिलांना कुकर वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला असून, या संकल्पाला पवईमधून सुरुवात झाली आहे. मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष तसेच फ्लाय फाऊंडेशनचे अध्यक्ष मुनाफ ठाकूर यांनी हा उपकम आयोजित केला असून, आगामी महिनाभरात विविध ठिकाणच्या आदिवासी पाड्यांवर १ हजार आदिवासी कुटुंबांमध्ये महाराष्ट्र सैनिक हे कुकर पोहोचवणार असल्याचा संकल्प करण्यात आला आहे.

पवईतील साई बांगोडा, उलटन पाडा येथील आदिवासी महिलांना कुकर वाटप करून शुक्रवारी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कुकर वाटप करताना पक्षाच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या सह आदिवासी महिला उपस्थित होत्या.

कित्येक आदिवासी महिला अजूनही चुलीवर जेवण करत असून ऊर्जा बचत विचारांपासून दूर आहेत. आदिवासी पाड्यांवर महिलांना कुकर भेट देणार असे कळविल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या उपक्रमासाठी मनसे प्रभाग १२५ उपशाखाध्यक्ष राहुल अप्पा कदम यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थ निवासस्थानी मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

“या उपक्रमातून ऊर्जा बचतीचा संदेश या लोकांपर्यंत नक्की पोहचेल,” असे यावेळी बोलताना राहुल कदम म्हणाले.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!