पवईचं हवामान बिघडलं?

बुधवारी सकाळी १० वाजता पवईचा एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच (एक्यूआय) १७७

मुंबईसह, नवी मुंबई परिसरात गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे. हिवाळ्यात पडणारा पाऊस, वाढलेली आर्द्रता यासारख्या असंख्य कारणामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे.

सफर या हवेची गुणवत्ता दर्शवणाऱ्या संस्थेने मुंबईच्या एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच (एक्यूआय)मध्ये वर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यात वायू प्रदूषण वाढल्याची नोंद केली आहे. या संस्थेने दर्शवलेल्या एअर क्वालिटी इंडेक्सनुसार पाठीमागील आठवड्यात संपूर्ण शहराचा एक्यूआय ३०० हून अधिक नोंदवण्यात आला आहे.

मुंबईतील कुलाबा, माझगाव, वरळी, वांद्रे, कुर्ला, मालाड, भांडूप, चेंबूर या ठिकाणी हवा वाईट असल्याची नोंद करण्यात आली. सर्वांत प्रदूषित झालेल्या ठिकाणांमध्ये कुलाबा ३३२, मालाड ३३२, बीकेसी ३३६, बोरिवली ३०३ या ठिकाणांचा समावेश आहे. तर पवई १०७ भांडूप ११४, माझगाव १९०, वरळी १२१ या ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या हवेची नोंद करण्यात आली. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बुधवार, २० जानेवारीला सकाळी १० वाजता aqcin ने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार पवईतील एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच (एक्यूआय) १७७ नोंदवण्यात आला आहे. ही धोकादायक पातळी म्हटले जाते. वायू प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम हा वृद्ध आणि लहान मुलांवर होतो. हृदयरोग, कर्करोग, श्वसनाचे विकार यासारखे आजार असणाऱ्यांना वायू प्रदूषणाचा धोका जास्त असतो. शिवाय प्रदूषणामुळे डोळ्यांना खाज, कोरड्या हवामानामुळे त्वचेवर परिणाम होणे अशा तक्रारी सुद्धा उद्भवतात. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दम्याने त्रस्त असलेल्या रुग्णांनी प्रदूषण वाढल्यानंतर काळजी घेणं गरजेचे आहे.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!