सायबर फसवणुकीत ऑटोरिक्षा चालकाला १.४ लाखाचा फटका

पवई पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या एका ऑटोरिक्षा चालकाची डिजिटल वॉलेटवर आधारित पेमेंट अ‍ॅप्लिकेशन सेटअप करण्यास मदत करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने १.४ लाखाची फसवणूक केली आहे. अज्ञात आरोपीने त्या अ‍ॅप्लिकेशन कंपनीचा प्रतिनिधी असून, अ‍ॅप सेटअप आणि बँकेची नोंदणी करण्यास मदत करण्याच्या बहाण्याने ऑटोरिक्षा चालकाला फसविले. यासंदर्भात पवई पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी ४० वर्षीय तक्रारदार ऑटोरिक्षा चालक सुलभ व्यवहारासाठी आपल्या फोनवर ऑनलाइन पेमेंट अॅप सेटअप करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, त्याला आणि त्याच्या मुलीला ते शक्य झाले नाही.

मनोज नामक एका व्यक्तीने फोन करून तो त्या अ‍ॅप्लिकेशन कंपनीचा प्रतिनिधी असल्याचा दावा करत आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधून देत असल्याचे सांगितले.

वरिष्ठ प्रतिनिधीशी संपर्क साधला असता त्याने या समस्येचे निराकरण करण्यासाठी ‘टीम व्ह्यूअर क्विक सपोर्ट अॅप’ नामक स्क्रीन शेअरिंग अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने एक नंबर सामायिक करण्यास सांगितला, नंतर त्याने आपला बँक तपशील जसे की खाते क्रमांक, डेबिट कार्डची समाप्ती तारीख, सीव्हीव्ही आणि इतर तपशील इनपुट करण्याची सूचना दिली. काही वेळातच माझ्या खात्यातून विविध व्यवहाराच्या माध्यमातून आणि गमावलेली रक्कम परत करण्याच्या बहाण्याने १.४ काढले गेले, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात रिक्षाचालकाने म्हटले आहे.

“आपण फसवणुकीला बळी पडले असल्याचे समजताच फिर्यादी रिक्षाचालकाने त्वरित आपला मोबाइल डेटा बंद केला आणि स्क्रीन शेअरिंग अॅप काढून टाकले. याबाबत त्याने पवई पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जाच्या आधारे अज्ञात व्यक्तींविरूद्ध आयपीसी आणि आयटी कायद्यातील संबंधित कलमांखाली फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “पेमेंट रोखण्यासाठी बँकेच्या नोडल अधिकाऱ्याला पत्रव्यवहार करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.”

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!