बँक कर्मचाऱ्याला सायबर चोरट्याने ६० हजाराला गंडवले

एका राष्ट्रीयीकृत बँकेत (nationalised bank) व्यवस्थापक (manager) म्हणून काम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेला ऑनलाईन केवायसी अपडेटच्या (online KYC update fraud) नावाखाली ६० हजार रुपयांना सायबर चोरट्यांनी (cyber thieves) गंडवले आहे. पवई (Powai) येथे राहणार्‍या या महिलेने बचत खाते असलेल्या बँकेच्या अॅपवर तिच्या पॅनकार्डची माहिती (pan card details) अपडेट करण्यासाठी एसएमएस अलर्टमध्ये प्राप्त झालेल्या नंबरवर कॉल केला होता.

तिने प्रथम स्वतःहून पॅन अपलोड करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यानंतर तिने एसएमएसद्वारे प्राप्त झालेल्या नंबरवर कॉल केला आणि कॉलला प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तीने लगेच तिला मदत करण्यास सहमती दर्शवली.

फोनवरील व्यक्तीने महिलेला वन-टाइम पासवर्डसह (one time password) बँकिंग तपशील (bank details) मागितले. महिलेने ती माहिती देताच तिच्या खात्यातून लगेच पैसे काढले गेले. तिने पुन्हा त्या व्यक्तीला फोन करून तिच्या खात्यातून डेबिट झालेल्या पैशांची चौकशी केली. “त्या व्यक्तीने तिला सांगितले की पैसे चुकून कापले गेले आहेत. त्याने तिला पैसे परत करण्यासाठी पाठवलेला दुसरा ओटीपी त्याच्यासोबत शेअर करण्यास सांगितले,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

बँक मॅनेजरला संशय आला आणि तिने फोनवरील व्यक्तीशी ओटीपी शेअर केला नाही. त्यानंतर तिने बँक आणि पवई पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.

“आम्ही एवढी जनजागृती करत असताना चक्क एका बँक कर्मचाऱ्याने सायबर फसवणुकीला बळी पडणे म्हणजे आश्चर्यच आहे. त्यांनी नागरिकांना अशा फसवणुकीसाठी जागृत करणे अपेक्षित आहे. मात्र तेच बळी पडत आहेत,” असे यासंदर्भात बोलताना सायबर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!