बेस्ट ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत प्रीमियम बससेवा सुरू करणार

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सपोर्ट (बेस्ट – BEST) ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत प्रीमियम बस सेवा सुरू करणार आहे. पवईसह बीकेसी, ठाणे येथे ही बससेवा असणार आहे. या सर्व बसेस इलेक्ट्रिक असणार आहेत. शहरातील रस्त्यांवरील कारची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरु करण्यात येत आहे.

नवरात्रीपासूनच ही बससेवा सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले होते.

“प्रवासी ‘चलो अॅप’द्वारे (Chalo App) या सेवेचे तिकीट बुक करू शकणार आहेत,” असे यासंदर्भात बोलताना बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “प्रिमियम बस सेवेच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत १०० बसेस धावतील. तसेच २०२३ पर्यंत ही संख्या १,००० बसेसपर्यंत वाढवण्याचा उद्देश आहे. ही सेवा प्रामुख्याने बीकेसी ते ठाणे आणि पवई यासारख्या कॉर्पोरेट कार्यालये असलेल्या भागात उपलब्ध असेल.”

एका बसमध्ये ५० ते ९० प्रवासी असतील. या शहरातील अनेक कार वापरकर्ते या सुविधेमुळे बेस्ट बसेसकडे वळले तर रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल, जे वाहतूक कोंडीचे एक प्रमुख कारण आहे.

बेस्टने शाश्वत दळणवळणाचा एक भाग म्हणून कार्यालयीन वापरासाठी इलेक्ट्रिक कारकडे स्थलांतर केले आहे. तर बेस्टने लोकांसाठी ४०० ईव्ही बसेस दाखल केल्या आहेत.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!