महानगरपालिका निवडणुकीत पवईला आरक्षण

रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण

bmc-ward-no-122 मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रभागांचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. या निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना झाली असून यावेळी महापालिकेच्या २२७ पैकी १५ वॉर्ड अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. पवईतील प्रभाग क्रमांक ११५ चे १२२ तर ११६ चे १२१ प्रभागात विभाजन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १२२ हा ओबीसी महिला आरक्षित झाला आहे, तर १२१ हा अनुसूचित जाती (एस सी) महिला वर्ग करण्यात आला आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये मुंबई महानगर पालिकेची निवडणूक होणार आहे. मुंबईतील रहिवासी क्षेत्र घटल्याने लोकसंख्या कमी झाली असली तरी मात्र उपनगरांमधील लोकसंख्या वाढली आहे. यासाठी यावर्षी प्रभागांची फेररचना करण्यात आली आहे. सोमवारी वांद्रे येथील रंगशारदामध्ये आरक्षण सोडत जाहीर झाली. या आरक्षण सोडतीमुळे पालिकेतील सर्वच प्रभागांची उलथापालथ झाली आहे.

bmc-ward-no-121पवईमधील प्रभागांमध्ये बदल झाले असून इथून पुढील काळात प्रभाग ११५ हा १२२ असेल तर प्रभाग ११६ हा १२१ प्रभाग म्हणून ओळखला जाईल. प्रभाग रचनेच्या या फेरबदलामुळे सत्ताधारी आणि इच्छुक उमेदवारांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्यासारखे झाले आहे. घराणेशाही असणाऱ्या उमेदवारांमध्ये यंदा आपल्या घरातील कोणीच मैदानात उतरू शकत नाही याचे दुखः असतानाच त्यांनी १२०,१२१ आणि १२२ अशा तिन्ही प्रभागातून आपल्या गोटातले उमेदवार उतरवायची तयारी सुरु केली आहे.

आरक्षणात दोन्ही प्रभागात महिलांना स्थान दिल्याने २०१७ च्या निवडणुकीत सर्व पक्ष कोणाला मैदानात उतरवणार याची पवईकरांना उत्सुकता लागून राहिली आहेच, पण यावेळी महिलांमध्ये निवडणूक जिंकण्याचे शर्थीचे प्रयत्न पवईकरांना पहावयास मिळणार आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!