पवईत व्यावसायिकाची कारमध्ये गळफास घेवून आत्महत्या

कारमध्ये गळफास घेवून आत्महत्यापवईतील जलवायू विहारच्या पाठीमागील जैन मंदिर रोडवर शुक्रवार २६, जूनला सकाळी एका कारमध्ये ४१ वर्षीय व्यवसायिकाचा मृतदेह पवई पोलिसांना मिळून आला आहे. नैराश्यातून त्याने कारमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अधिक तपास सुरु आहे.

या संदर्भात पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मुख्य नियंत्रण कक्षाकडून एसएम शेट्टी शाळेजवळील म्हाडा इमारत क्रमांक २३ समोर रस्त्यावर उभ्या मोटार कार क्रमांक डीएल १ सीएस ७९८२मध्ये एक इसम मृतावस्थेत पडल्याचा संदेश प्राप्त झाला होता. “आम्ही घटनास्थळी धाव घेत माहिती मिळवली असता बिनीत रामपारस सिंग (४१) याचा तो मृतदेह असल्याची समोर आले,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

कारमध्ये गळफास घेवून आत्महत्या

पोलीस पंचनामा करताना

सकाळी मोर्निग वॉकसाठी कुत्रे घेवून बाहेर पडलेल्या एक इसमास कारमधून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यावर त्याने पाहिले असता एक इसम गाडीत पडला असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी मेन कंट्रोल रूमला माहिती दिली.

“कारमधील ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटच्यावर हँडलला गळफास लावून सिंग यांनी आत्महत्या केली होती. समोरील म्हाडा इमारतमध्येच ते राहत होते, तसेच त्यांचा सोलारचा व्यवसाय होता. त्यांच्या घरातील व्यक्ती आणि मित्र यांच्या जवाबानुसार त्यांना व्यवसायात नुकसान झाले होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“सदर घटनेबाबत पवई पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, आम्ही अधिक तपास करत आहोत,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी सांगितले.

कारमध्ये गळफास घेवून आत्महत्या

फोटो: प्रमोद चव्हाण

प्रथमदर्शनी आत्महत्या

“प्रथमदर्शनी कारमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. उद्या त्याचा अहवाल येईल, तेव्हा नक्की कारण समोर येवू शकते,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल पाठारे यांनी सांगितले.

“पोलिसांना गाडीच्या डीक्कीमध्ये एक बॅग सुद्धा मिळून आली आहे. त्यात कपडे आणि इतर सामान पोलिसांना मिळून आले आहे,” असेही पोलिसांनी सांगितले.

गाडीच्या डिक्कीत पोलिसांना मिळालेली बॅग

पोलीस मित्र गाडीचे निर्जंतुकीकरण करताना

पोलीस नातेवाईक आणि मित्रांचे जवाब नोंद करताना

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!